Pest control contract jumps to Rs 46 crore in Nashik MNC marathi news
Pest control contract jumps to Rs 46 crore in Nashik MNC marathi news 
नाशिक

अबब...! पेस्ट कंट्रोल ठेक्याची उडी ४६ कोटींवर; विभागनिहाय ठेका देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

विक्रांत मते

नाशिक : शहरात पेस्ट कंट्रोलचा ठेका पहिल्यांदा १९ कोटी, दुसऱ्या वर्षी ३३ कोटी, आता पुढील वर्षासाठी तब्बल ४६ कोटींवर पोचल्याने महापालिकेची निविदा समितीसुद्धा अचंबित झाली आहे. वाढीव दराबाबत नकारात्मक शेरा मारून थेट आयुक्ताकडे प्रस्ताव पुन्हा पाठविला. परंतु भाजपच्या जळगावस्थित मोठ्या नेत्याचा दबाव असल्याने ठेका मंजुरीसाठी भाजप नेते सरसावले आहेत. 

शहरात धूर फवारणीसाठी महापालिकेने २०१६-१७ मध्ये तीन वर्षांसाठी १९ कोटी रुपयांचा पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला होता. त्या ठेक्याची मुदत ऑगस्ट २०१९ ला संपल्यानंतर नव्याने ठेका देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. त्या वेळी पूर्वीच्या ठेक्याच्या किमतीत तब्बल चौदा कोटींची वाढ करण्यात आली. जून २०१९ मध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतु घंटागाडीप्रमाणे विभागनिहाय की प्रभागनिहाय ठेका द्यायचा, यावरून गोंधळ घातला गेल्याने ठराव मिळण्यास विलंब झाला. विलंबाने ठराव मिळाल्याने प्रशासनाने पूर्वीच्याच ठेकेदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली.

१३ कोटींची वाढ

आता पुन्हा नव्याने निविदाप्रक्रिया राबविताना ठेक्यात पुन्हा १३ कोटींची वाढ करताना ४६ कोटींवर ठेका पोचला आहे. निविदा समितीने वाढीव किमतीवर आक्षेप घेतला असला, तरी प्रस्ताव तयार करणाऱ्या डॉक्टरने पुढील तीन वर्षांत डिझेलचे दर वाढतील, असे गृहीत धरून किंमत वाढविल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या डिझेल पंपावरून डिझेल पुरविण्याची तरतूद असताना ही बाब दुर्लक्षित करण्यात आली आहे. 

भाजपच्या मदतीला डॉक्टर 
पेस्ट कंट्रोलच्या पूर्वीच्या ठेक्यासंदर्भात अनेक तक्रारी असल्याने नगरसेवकांची विभागनिहाय ठेका देण्याची मागणी होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करत पुन्हा त्याच दिग्विजय एंटरप्राइजेसला काम देण्याची तयारी दर्शविताना ठेक्याची किंमत वाढविण्याची किमयाही साधली आहे. ३३ कोटींवरून ४६ कोटींवर पोचलेल्या या ठेक्यामध्ये उर्वरित १३ कोटींमध्ये अनेक नगरसेवकही पार्टनरशिप असल्याचे बोलले जात आहे. वैद्यकीय विभागात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीचे अधिकार प्राप्त झालेल्या एका डॉक्टराने रस घेतल्याने भाजपच्या मदतीला प्रशासन सरसावल्याचे दिसून येत आहे. दिग्विजय एंटरप्राइजेसला ठेका मिळावा म्हणून संपूर्ण भाजप मैदानात उतरली असली, तरी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आयुक्त गमे यांच्याकडे पत्राद्वारे विरोध दर्शविला आहे. 

रिपोर्ट- विक्रांत मते

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT