PFI official Maulana Saifur Rehman in custody of ATS
PFI official Maulana Saifur Rehman in custody of ATS esakal
नाशिक

PFI Action Case : 'त्या' संशयितांकडे Fundingसंदर्भात कसून चौकशी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एटीएस महाराष्ट्राने गुरुवारी (ता.२२) पहाटेच्या दरम्यान पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या धरपकडीनंतर नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलेल्या जिल्हाध्यक्ष असलेला संशयित मौलाना सैफूर रहमान यांची शुक्रवारी (ता.२३) दुसऱ्या दिवशीही दहशतवाद विरोधी विशेष पथकाने संघटनेस मिळालेल्या फंडिंगप्रकरणी कसून चौकशी केली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही संशयितांची चौकशी केली जाणार आहे. तसेच यासाठी पथकातील वरिष्ठ अधिकारी हे नाशिकलाच तळ ठोकून आहेत. (PFI Case interrogation of suspects regarding Funding by ATS Nashik crime Latest Marathi News)

देशविघातक कारवाई आणि समाजात अशांतता निर्माण करत असल्याच्या कारणावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील अकरा राज्यातील दहशतवाद विरोधी पथकांच्या साह्याने राज्यभर छापे टाकले. एटीएसने राज्यभर छापेमारी करीत सुमारे २० जणांना तर संपूर्ण राज्यातून १०६ जणांना ताब्यात घेतले आहे.

या छाप्यात नाशिक जिल्ह्यातून पीएफआय या संघटनेच्या जिल्हाध्यक्षास अटक केली. त्यानंतर आणखी पाच जणांनाही अटक करण्यात आली आहे. मौलाना रहमान यास अटक करून नाशिकच्या एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले. या सर्व संशयितांना १२ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

आज दुसऱ्या दिवशी संशयित यांच्याकडून आर्थिक देवाण-घेवाण संदर्भात चौकशी करण्यात आली. यास विदेशातून पैसे आले आहे का याबाबत चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समजते. मात्र या तपासाबाबत कमालीची गुप्तता विभागाकडून बाळगली जात आहे.

Remarks :

संशयितांकडून दुसऱ्या दिवशी कसून चौकशी

Audit History:Date/Time Description ActionBy

9/23/2022 8:02:54 PM New Story Created skunal

9/23/2022 8:03:46 PM Story moved to desk Nashikcity skunal

9/23/2022 8:08:59 PM Story moved to kprashant kprashant

9/23/2022 8:09:13 PM Story is queued for transmission to location abd,Goa,KOP,Mum,ngp,Pne kprashant

9/23/2022 8:09:36 PM Story transmission to location Mum,Pne,KOP,Goa,abd,ngp is Successfull Transmission

9/23/2022 8:23:31 PM Story Edited

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT