Deputy Sarpanch Bapusaheb Kadale accepting the first award of the district under the Sundar Gaon Yojana from Minister Girish Mahajan
Deputy Sarpanch Bapusaheb Kadale accepting the first award of the district under the Sundar Gaon Yojana from Minister Girish Mahajan esakal
नाशिक

पिंपळगाव बसवंत ठरले 'सुंदरगाव'; जिल्ह्यात प्रथम पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगांव बसवंत ग्रामपंचायतीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेत पिंपळगाव बसवंतने निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

यापूर्वी सलग दोनदा माझी वसुंधरा योजनेत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, आएसओ मानांकन असा सन्मान झाल्यानंतर पुरस्काराला गवसणी घालण्याची परंपरा पिंपळगाव ग्रामपंचायतीने कायम राखली आहे.

ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या समन्वयातून पिंपळगावचा चेहरामोहरा बदलल्याने सुंदरगाव पुरस्काराचे धनी होता आले. स्वांतत्र्यदिनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार पिंपळगाव ग्रामपंचायतीला देण्यात आला. (Pimpalgaon Baswant become Beautiful village First Award in District nashik Latest Marathi News)

एखादा उपक्रम फक्त पारितोषिक मिळविण्यापर्यत राबवायचा, हेतू साध्य होताच त्याला हरताळ फासले जाते. याबाबतीत पिंपळगाव ग्रामपंचायत अपवाद ठरली आहे. पर्यावरणपूरक उपक्रम राबवित सलग दुसऱ्या वर्षी माझी वसुंधरा योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवित पिंपळगाव ग्रामपंचायतीने इतिहास घडवित अडीच कोटी रूपयांचे बक्षीस मिळविले.

प्रशाकीय कामकाजात संगणकीकरण व गतिमानता आणून राज्यात सर्वात पहिल्यादा आयएसओ मानाकंन मिळविले. स्मार्ट ग्राम अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना यात सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रामपंचायतीला जिल्हा व तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे. मंत्री महाजन यांच्या हस्ते उपसरपंच बापूसाहेब कडाळे, सदस्य संजय मोरे, ग्रामविकास अधिकारी एल. जे. जंगम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महत्त्वाच्या नोंदी अशा

पाच वर्षे शुध्द पाणीपुरवठा करून संवेदनशील परिसर असूनही गावात कोणतेही जलजन्य साथीचे आजार उदभवू दिले नाही. त्याबद्दल चंदेरी प्रमाणपत्राने बहुमान झाला. शहरातील प्रत्येक वॉर्डात उद्यान उभारून मुलांसाठी खेळणी, ग्रीनजीम, जॉंगिग ट्रॅक, विविध वृक्षांची लागवड असे शहराच्या सौदर्यात भर घालणारे उपक्रम राबविले.

आॅक्सीजन पार्क’ची निर्मिती केली. वृक्षगणना करून ती गुगल मॅप टाकणारी पिंपळगाव ही राज्यात पहिलीच ग्रामपंचायत ठरली. सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारला गेला. शहरातील दररोज नऊ ते दहा टन कचऱ्याचे विलगीकरण करून घनकचरा प्रकल्प उभारला.

शुद्दीकरण केंद्रात वाया जाणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून सुमारे १८ कोटी लिटर पाण्याची बचत केली. अकरा घटांगाड्याच्या माध्यमातून गाव स्वच्छ ठेवले जाते. स्मार्ट व्हीलेजकडे वाटचाल करणाऱ्या पिंपळगावची दखल आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेत घेतली गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Dindori Lok Sabha Election 2024 : 'मविआ'ला मोठा दिलासा! दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपची उमेदवारी मागे

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; चेन्नईची मदार जडेजावरच

SCROLL FOR NEXT