Passengers taking a ride in a pink rickshaw that has entered service.  esakal
नाशिक

Pink Rikshaw : प्रवाशांच्या सेवेत ‘पिंक रिक्षा’ दाखल!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महिला सक्षमीकरणास चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार दिला आहे. याअंतर्गत शहरातील दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा वितरित केली आहे. आता या रिक्षा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्‍या आहेत. (Pink Rickshaw started at nashik news)

शहरात महिलांसाठी पिंक रिक्षा धावू लागल्याने सुरक्षित प्रवासाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे. मागील महिन्यातच शहरातील महिला लाभार्थी नीता बागूल आणि शोभा पवार या दोन गरजू महिलांना रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झुंजूनूवाला यांच्या हस्ते पिंक रिक्षांचे वितरण केले होते.

रोटरी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल बरडीया आणि सचिव ओमप्रकाश रावत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला. नुकताच या रिक्षा प्रवासी सेवेसाठी दाखल झाल्‍या आहेत. उपक्रमांतर्गत रोटरी संस्थेमार्फत शहरात आणखी पिंक रिक्षा देण्याचा मनोदय अध्यक्ष प्रफुल्ल बरडीया यांनी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी

यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी पुढे येत आहेत. आणखी ६ ते ७ पिंक रिक्षा गरजू महिलांना द्यायच्‍या असून, रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्‍या गरजू महिलांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

आरटीओ परवाना तसेच प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड या कागदपत्रांसह कर्ज घेण्याची पात्रता आहे, अशा गरजू महिलांनी येत्‍या २७ मेपर्यंत अर्जासह रोटरी क्लब ऑफ नाशिक सभागृहात भेट द्यायची आहे. अर्जांची पडताळणी आणि छाननी करून पात्र आणि गरजू महिलांची निवड विशेष समितीमार्फत केली जाईल, असे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT