MSRTC esakal
नाशिक

Nashik : पूरस्थितीत अतिरिक्त बससेवा राज्य परिवहन महामंडळाचे नियोजन

कुणाल संत

नाशिक : मॉन्सून काळात (Monsoon Season) पूरस्थिती, अपघात, साथीच्या रोगांचा फैलाव अशा स्वरूपाच्या आपत्तींचा सामना करावा लागतो. अशावेळी त्या मार्गावरील अडकलेल्या प्रवाशांना आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत (MSRTC) अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. (Planning of additional bus services by MSRTC in flood times Nashik News)

आपत्कालीन परिस्थतीत नागरिकांना सुरक्षित स्थळी पोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करून या काळात घडणाऱ्या घटना किंवा परिस्थितीबाबत वरिष्ठांना वेळोवेळी अहवालही सादर करण्यात येणार आहे. मॉन्सून काळातील यात्रा- उत्सवानिमित्ताने भाविकांसाठी वाहने उपलब्ध करून देण्याबाबत स्वतंत्र नियोजनही करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्थेबरोबर क्रेन, पाण्याचे टँकर असे आवश्यक साहित्य आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी वेळेत मदत पोहचावी व दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, या काळात नागरिकांपर्यंत तत्काळ मदत पोचविण्यासाठी महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, फॅक्स, नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक व ई- मेल आयडी आदी माहिती असणारा स्वतंत्र नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT