PM Modi bows at Kalaram temple in nashik news esakal
नाशिक

PM Modi Nashik Visit: काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी नतमस्‍तक; 'सीयावर रामचंद्र की जय'च्‍या घोषणांनी दुमदुमला परिसर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१२) पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१२) पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट दिली. श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतांना ते नतमस्‍तक झाले. यावेळी पंतप्रधान मोदींच्‍या हस्‍ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती केली.

यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (PM Modi bows at Kalaram temple in nashik news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१२) पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट दिली.
याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्‍थितीत अभंग आणि भावार्थ रामायणातील आठव्या अध्यायाचे (श्लोकांचे) वाचन केले

काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी यांसह वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.

अभंगाचे वाचन

याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्‍थितीत अभंग आणि भावार्थ रामायणातील आठव्या अध्यायाचे (श्लोकांचे) वाचन केले. या श्‍लोकांमध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे.

काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी नतमस्‍तक

यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

स्‍वामी विवेकानंद यांच्‍या पुतळ्यास अभिवादन

काळाराम मंदिर परीसरात असलेल्‍या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण केले. अभिवादन करतांना ते तपोवन येथे कार्यक्रमस्‍थळी रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tajmahal Travel : ताजमहलाच्या खऱ्या कबरींचे रहस्य अखेर उघडले, २२ फूट खोल तळघरातील Video viral

ईदला नाहीतर आता 12 जूनला येतोय 'धमाल 4', 'या' कारणामुळे बदलली प्रदर्शनाची तारीख

Shankarpat competition: महिला शंकरपटात लक्ष्मी सोनबावणेने रचला इतिहास! सुंदर-राघव बैलजोडी अव्वल, मल्हार-मोगली दुसऱ्या स्थानी..

UP Health : आरोग्य क्षेत्रात यूपीची 'सुपरफास्ट' प्रगती! २ एम्स आणि ८१ मेडिकल कॉलेजसह बनणार देशाची'आरोग्य राजधानी'

Mumbai Marathon 2026: कोस्टल रोडचे अप्रूप आणि दमछाकही; चढ-उतारामुळे धावपटूंना त्रास, काहींची माघार

SCROLL FOR NEXT