police esakal
नाशिक

Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आतापासूनच सतर्क!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देवळाली गावात गेल्या आठवड्यात आगामी शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर बैठक झाली असता, त्यामध्ये राडा होऊन गोळीबाराची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.

मात्र, यामुळे येत्या काळात ठाकरे व शिंदे गटात या ना त्या कारणावरून राडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर, शहरातील विविध भागात शिवजयंती उत्सव समिती स्थापन करण्यासाठीच्या बैठका होत असून, त्यातही राडे होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या बैठकांतून कोणतीही विपरीत घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून या बैठकांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे, आगामी काळात ठाकरे- शिंदे गटात धुमश्‍चक्री टाळण्यासाठी शहर पोलिस आत्तापासूनच सतर्कता बाळगत आहेत. (Police alert on background of Shiv Jayanti 2023 nashik news)

१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यात साजरी होणार आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवसैनिकांमध्ये मोठा जल्लोष असतो. परंतु शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

त्यामुळे आगामी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाकडून कंबर कसली आहे. नाशिक शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. नाशिक आणि नाशिक रोड येथे मोठ्या जल्लोषात व मिरवणुका काढून शिवजयंती साजरी केली जाते.

दरम्यान, आगामी शिवजयंतीही दोन्ही गटाकडून जल्लोषात साजरी केली जाण्याचे संकेत आहेत. मात्र, नाशिकच्या शिवसेनेतही फूट पडल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण काहीसे गढूळ झाले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

तर, गेल्या आठवड्यात देवळाली गावात सार्वजनिक शिवजयंतीसाठी बैठक झाली असता, त्या ठिकाणी ठाकरे व शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये बाचाबाची होऊन मोठा राडा झाला. लाठ्या-काठ्या, हत्यारे उपसली गेली.

गोळीबारही करण्यात आला. याप्रकरणी उपनगर पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या राड्यामुळे आगामी शिवजयंती शांततेत पार पाडण्यासाठीची जबाबदारी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

राडा होण्याची शक्यता

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील उपनगरी भागातही सार्वजनिक शिवजयंती समिती स्थापन केल्या जातात. त्यासाठी शहरभर शिवसैनिकांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये ठाकरे व शिंदे गटाचेही कार्यकर्ते सामील होत असल्याने त्यातून राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बैठकांवरही पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT