thief arrested esakal
नाशिक

ATM फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला चोरट्याला रंगेहाथ पकडले | Nashik

राजेंद्र अंकार

सिन्नर (जि. नाशिक) : येथील नाशिक-पुणे महामार्गावरील बसस्थानकासमोर असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएम (ATM) फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. सिन्नर पोलिसांनी गुरुवारी (ता.१०) पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

अत्याधुनिक तंत्रामुळे चोरटा जेरबंद

चेतन बाळू आसळक (वय २१) राहणार पंचाळे, ता.सिन्नर असे या चोरट्याचे नाव आहे. बँकेच्या एटीएमला अलर्ट सिस्टिम बसविण्यात आलेली आहे. एटीएम फोडण्याचा प्रयत्न होत असताना अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारे अॅक्सिस बँकेच्या मुंबई येथील कार्यालयात याबाबत सावधानतेचा संदेश गेला. त्यानंतर मुंबईहुन सिन्नर पोलिसांना चोरी होत असल्याची खबर देण्यात आली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार श्रीकांत गारूंगे, प्रमोद भोये यांच्या पथकाने एटीएम केंद्रात जाऊन चोरट्यास पकडले. त्याने एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आले. संतोष झाडे यांनी पोलिसांत चोरीची फिर्याद दिली आहे. एटीएममध्ये नऊ लाख रुपये होते, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT