Police FIR esakal
नाशिक

पोलिस आयुक्तालयात गोंधळ घालणाऱ्या पिता- पुत्राविरुद्ध गुन्हा

अंबादास शिंदे

नाशिक रोड : सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय तथा न्यायदंडाधिकारी कक्षामध्ये गोंधळ घालून घोषणाबाजी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पिता- पुत्राविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग ४ तथा सहाय्यक दंडाधिकारी समीर शेख यांच्या कार्यालयात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांमधील चॅप्टर केस क्रमांक ३१३/ २०२१ मधील सामनेवाले अक्षय प्रकाश साळवे व इतर या प्रकरणात प्रतिबंधक कारवाईची सुनावणी सुरू असताना जेल रोड, मगर चाळ येथील शफीद्दीन कमृद्दिन काझी ( ५२) त्यांची मुले रफिक शफीद्दीन काझी (३०) व रिझवान शफीद्दीन काझी (२५) यांनी विनापरवानगी न्यायदान कक्षात प्रवेश करून कार्यकारी दंडाधिकारी यांच्या सुनावणीमध्ये अडथळा आणला. तेथील पोलिस कर्मचारी प्रकाश तुंगार यांनी काझी पिता- पुत्रांना न्यायदानाचे काम चालू असून बाहेर जाण्यास सांगितले असता, त्यांनी आरडाओरड करत शिवीगाळ व घोषणाबाजी करून त्यांना ढकलून दिले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी प्रकाश तुकाराम तुंगार यांच्या फिर्यादीवरून काझी पिता- पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला. नाशिक रोड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एम. डी. परदेशी करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

जय श्री राम म्हण तरच मिळणार पुरी भाजी... वृद्ध मुस्लीम व्यक्तीबरोबर भाजपा आमदाराचं असभ्य वर्तन, Video Viral

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Ramdara Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृहाच्या नूतनीकरणासाठी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT