नाशिक

वणीजवळ संशयित इको गाडीतून ४ गोवंशांची सुटका; पोलिसांची कारवाई, चालक फरार

CD
वणीजवळ चारचाकीतून गोवंशांची सुटका सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २ : रात्रीच्या वेळी भरधाव जाणाऱ्या संशयित चारचाकीचा पाठलाग करून वणी पोलिसांनी चार गोवंशांची निर्दयतेने होणाऱ्या वाहतुकीतून सुटका केली. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वणी ते पिंपळगाव रोडवरील खेडगाव शिवारामधील हॉटेल जगदंबासमोर करण्यात आली. या कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन गाडी चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस शिपाई मच्छिंद्र पिठे आणि त्यांचे सहकारी ३१ ऑक्टोबरच्या रात्री वणी गावात गस्त घालत होते. रात्री १२:१० वाजेच्या सुमारास सापुतारा बाजूकडून वणी बाजूकडे येणारी एक चारचाकी (एमएच १५ सीटी ३५७२) भरधाव जाताना दिसली. संशय आल्याने पोलिसांनी गाडीला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडीचा वेग वाढवून पिंपळगावच्या दिशेने पळ काढला. पोलीस पथकाने तत्काळ सरकारी वाहनाने पाठलाग करत खेडगाव शिवारात हॉटेल जगदंबासमोर इको गाडीला ओव्हरटेक करून रोखले. गाडी थांबताच चालक अंधाराचा फायदा घेत गाडी सोडून पळून गेला. गाडीची पाहणी केली असता, त्यात ४ गोवंश जातीची जनावरे तोंड व पाय क्रूरतेने बांधलेल्या अत्यंत वाईट स्थितीत आढळून आली. ​१ लाख २० हजार रुपये किमतीची कार व सुमारे ६० हजार रुपये किमतीची ४ गोवंश जनावरे असे एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दरम्यान सुटका करण्यात आलेल्या जनावरांना चारा-पाण्याची सोय करण्यासाठी वणी येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Life Abroad: भारतात घर घेणे अवघड असलेल्यांना विदेशात व्हिला अन् महागड्या गाड्या कशा घेता येतात?

Narendra Modi: जागतिक ऊर्जा संकटाचा भारतावर प्रभाव का पडला नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक मतदानाची टक्केवारी आली समोर

Pune Weather: पुण्यात परतीच्या पावसाची पाठ; ऑक्टोबरमध्ये अवघा १.७ मिमी पाऊस, ११ वर्षांतील नीचांकी नोंद

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT