Nashik Sakal
नाशिक

नाशिक : आंदोलन करणाऱ्या १३ हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हा

विनोद बेदरकर

नाशिक : शासनाच्या नियमावलीत रेस्टॉरंट (restaurant) चालकांची घोर निराशा झाल्याने महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने गोविंद नगरच्या दि नाशिक रेस्टॉरंट क्लस्टर येथे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनासाठी कुठलीही परवानगी न घेता हॉटेलला रात्री दहापर्यंत वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या १३ हॉटेल चालकाविरुद्ध अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

जवळपास सर्वच व्यावसायिकांना रात्री ८ वाजेपर्यंत वेळ वाढवून मिळाली असतांना रेस्टॉरंट व्यवसायासयातून वगळल्याने नव्या लॉकडाऊन (lockdown) नियमावलीचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिक मधील रेस्टॉरंट व्यावसायिकांनी संघटित होऊन याबाबतीत निदर्शने करून आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र या आंदोलनासाठी कोणतीही परवानगी न घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेदांशू पाटील, जय पवार, नितीन घेगडमल, श्रीकांत बोरसे, स्वप्नील एंडाईत, रॉबिन रिचर्ड डिसोझा, हेमंत कुलकर्णी, रोहीत कर्डिले, विकी बेलगावकर, हार्दिक पटेल, निखिल पालवे, पद्मनाभ मढीवाल आणि नीलेश धुळे, अशी गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल व्यवसायिकांची नावे आहेत. बुधवारी (ता. ४) सकाळी मागणीसाठी शासनाचा मनाई आदेश डावलून आंदोलन केले. पोलिस नाईक कैलास निबेंकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

मागील लॉकडाऊन असो अथवा आत्ताची गेली ४ महिने रेस्टॉरंट मालकांनी शासनाचे नियम पाळत आपल्या व्यवसायाची गाडी सुरु ठेवली होती. परंतु नव्या नियमावलीत झालेला दुजाभाव सहन न करण्याचा पवित्रा नाशिक मधील रेस्टॉरंट वाल्यांनी स्वीकारला आहे. रेस्टॉरंटला रात्री १० वाजेपर्यंतची वेळ वाढवून मिळावी, या प्रमुख मागणीसह आथिर्क पॅकेज साठीही सर्वच व्यावसायिक आग्रही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT