misal party
misal party esakal
नाशिक

मिसळ पार्टीत पोलीसांना नियमांचा विसर

विनोद बेदरकर

मिसळ पार्टीत नियमांचा विसर

विशेष पोलिस अधिकारी सत्कारातील दृश्य

नाशिक : लॉकडाउनमध्ये (lockdown) पोलिसांना सहकार्य करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांप्रति कृतज्ञता म्हणून प्रशासकीय यंत्रणेतर्फे रेड क्रॉस सिग्नल परिसरात सत्कार व मिसळ पार्टीचा कार्यक्रम झाला. नागरिकांना शिस्त लावण्यात पोलिसांच्या (police) खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांप्रति कृतज्ञता म्हणून हा कार्यक्रम ठीक असला तरी त्यात चक्क पोलिस आणि तात्पुरते पोलिस अधिकारी असे सगळेच लॉकडाउनचा नियम विसरले. (police-forgot-lockdown-rules)

मिसळ पार्टीत नियमांचा विसर

सरकार वाडा पोलिस ठाण्यातर्फे कोरोनाकाळात पोलिस प्रशासनासोबत २४ तास कार्यरत समाजातील काही नागरिक विशेष पोलिस अधिकरी म्हणून बंदोबस्तात मदत करत आहेत. याच विशेष पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार मिसळ पार्टीत झाला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपायुक्त अमोल तांबे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी आदी उपस्थित होते.

..तर जास्त कौतुक

शहरातील सामान्य नागरिकांसाठी संचारबंदीचा नियम पाळला नाही म्हणून दंडुक्याचा प्रसाद देणाऱ्या आणि मंडप टाकून वीसपेक्षा अधिक लोकांना परवानगी न देणाऱ्या यंत्रणेच्या कार्यक्रमात चक्क सार्वजनिक रस्त्यावर मंडप टाकून त्याहून अधिकची गर्दी जमली होती. त्यामुळे लोकांसाठी जो नियम तो पोलिसांनी पाळून किंवा पोलिसांच्या बंदिस्त सभागृहात हा सत्कार सोहळा घेतला असता, तर अधिक सोईस्कर झाले नसते का, अशी नागरिकांत चर्चा होती.

कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांना नियम पाळण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यासोबतच्या विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी चांगली भूमिका बजावली. पोलिसांच्या वर्दीप्रति असलेल्या भावनेतून लोकांनी नियम पाळले. त्यामुळेच विशेष पोलिस अधिकारी कौतुकाला पात्र आहेत. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT