sakal
नाशिक

नाशिक: बारकोड स्कॅनिंगकडे पोलिसांचे दुर्लक्ष

लॉकडाउन काळातील बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या गस्तीचा प्राधान्यक्रम बदलला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक: लॉकडाउन काळातील बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या गस्तीचा प्राधान्यक्रम बदलला. गस्तीवरील पोलिस पथकांनी गस्त केली की नाही, याची खातरजमा करण्यासाठी क्युआर कोड स्कॅनिंगच पध्दत शहरात जवळपास बंदच पडली आहे. त्यामुळे अनेक नवीन उपनगरात गस्तीअभावी पुन्हा एकदा उद्यानातील सोनसाखळ्या चोऱ्या वाढल्या आहेत.

सोनसाखळ्या ओरबडणारे पोलिसांच्या हाती लागत नाही. पोलिसांच्या गस्तीत शिथीलता आल्याने सोनसाखळ्या चोरांची हिंमत वाढली आहे. त्यातून गत वर्षीच्या तुलनेत यंदा स्त्रीधन लुटण्याच्या घटनांमध्ये १४ इतकी वाढ झाली होऊन आठ महिन्यात सोनसाखळ्या ओरबडण्याचे प्रमाण ५२ झाले आहे. मात्र, या ५२ पैकी जेमतेम दोनच सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याने पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गस्ती घटल्याने शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळ्या ओरबडण्याचे प्रकार सुरू झाले आहे. टाकळी रोड, मुंबई- आग्रा महामार्ग, इंदिरानगर, अंबड, उपनगर, पंचवटी, आडगाव, जेल रोड भागात सोनसाखळ्या चोरीचे प्रकार वाढले आहे.

टाकळी-तपोवन रोड रडारवर

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोखंडे मळ्यात उद्यानातील पार्ट्या कायम डोकेदुखीचा विषय झाला आहे. आता या भागात दिवसाढवळ्या सोनसाखळ्या चोरांचा उच्छाद सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी उषा सदाशिव तेजाळे (६३, रा. पुष्पकनगर, लोखंडे मळा) या एका लॅबमध्ये शुगर चेक करण्यासाठी पायी जात असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ९५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ खेचून टाकळी रोडने पलायन गेले.

दुसऱ्या घटनेत मखमलाबाद नाका भागातील लक्ष्मी नितीन तागड (रा. उदय कॉलनी) या गुरुवारी टाकळी येथे गेल्या होत्या. तपोवन रोडने त्या दुपारी घरी स्कुटीवर परतत असताना केवडीबनकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि गंठण, असे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिणे ओरबाडून नेले. हे बघता, जुना सायखेडा रोड टाकळीमार्गे तपोवन रोड चोरट्यांच्या रडारवर असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT