नाशिक

कसमादेत दिवाळीनंतर शेती कामांची लगबग

CD
कसमादेत दिवाळीनंतर शेती कामांची लगबग ----------------- मका कापणी, कांदा लागवडीला वेग सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता.१५ : दिवाळीनंतर कसमादेत शेती कामांना वेग आला आहे. शेतातील मका, बाजरी कापणी व काढणीचे काम सुरु आहे. काही ठिकाणी कांदा लागवड केली जात आहे. दिवाळीमुळे शेत मजुरांनी सुटी घेतल्याने आठवडाभर शेती कामे जवळपास बंद हाेती. पुरेशा पावसाअभावी मक्याचे उत्पन्न अल्प प्रमाणात आले आहे. करपलेल्या मक्याचा चारा शेतकरी गोळा करीत आहेत. शेतातील मका, बाजरी कापणी, कणीस खुडणे, मळणी करणे आदी कामे केली जात आहेत. पाणी असलेल्या भागात लाल कांद्याची लागवड होत आहे. कसमादेत पुरेशा प्रमाणात शेत मजुर उपलब्ध होत नाहीत. मजुर टंचाईचा प्रश्‍न कायम आहे. मका, बाजरी कापणीचे काम रोजंदारीवर करण्यास मजूर धजावत नाहीत. मक्ता पद्धतीने ही कामे केली जात आहेत. कमी क्षेत्र असलेले शेतकरी स्वत:च ही कामे करीत आहेत. मजुरांअभावी काही ठिकाणी मका कापणी बाकी आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. पुरेसे उत्पन्न न आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. आगाऊ लागवड केलेला लाल कांदा काढणीला आला आहे. मक्याला सरासरी अडीच हजार ते २ हजार ८०० रुपये क्विंटल दरम्यान भाव मिळत आहे. मका कापणीनंतर काही शेतकरी उपलब्ध पाण्याच्या हिशेबाने पुढील पिकासाठी शेतीच्या मशागतीच्या तयारीला लागला आहे. ----- कोट... दुष्काळी परिस्थितीमुळे मका पिकाला कणसे आली नसून चारा गोळा करावा लागत आहे. दिवाळी सणामुळे शेतातील कामे खोळंबली आहेत. मका पीक वाया गेल्याने गहू व लाल कांदा लागवड सुरु आहे. मजुरांअभावी कामे लांबली आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. - राजेंद्र शेवाळे, शेतकरी, टेहरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, वाहनचालक धडक देऊन पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

SCROLL FOR NEXT