Nashik smart city road development work esakal
नाशिक

Nashik : पेठ रोडचे दारिद्र्य मिटणार; Smart City Company मार्फत रस्ता दुरुस्ती

विक्रांत मते

नाशिक : गुजरात राज्याकडून महापालिका हद्दीत प्रवेश केल्यानंतर पेठ रोडचे दारिद्र्य आता निधीअभावी स्मार्टसिटी कंपनीच्या शिल्लक निधीमधून केले जाणार आहे. या संदर्भात स्मार्टसिटी कंपनीला प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यानुसार खर्चाची तयारी दाखवली आहे. त्यापूर्वी शिल्लक निधीमधून किती खर्च करता येईल, याची चाचणी करण्यासाठी लेखाधिकाऱ्‍यांकडे स्मार्टसिटी कंपनीमार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. (Poverty of Peth Road will eradicated Road repair through Smart City Company Nashik Latest Marathi News)

पेठ रोड मार्गे नाशिक महापालिका हद्दीत प्रवेश केल्यानंतर जवळपास चार किलोमीटरच्या रस्त्याची दैना उडाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना सी-सॉ प्रमाणे खेळ करावा लागतो, अशी परिस्थिती आहे. सदर रस्त्याचे शकले उडाल्यानंतर महापालिकेने रस्ता दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे रस्त्या संदर्भातील कैफियत मांडताना महापालिकेला तातडीने रस्ता तयार करण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, चार किलोमीटरच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी जवळपास ७१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र महापालिकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने जिल्हा नियोजन प्राधिकरणामार्फत रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, जिल्हा नियोजन समितीकडे फक्त २८ कोटी रुपये शिल्लक असल्याने महापालिकेला निधी देता येणार नसल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार रस्त्याची गरज लक्षात घेता आमदार ढिकले यांनी स्मार्टसिटी कंपनीच्या शिल्लक निधीमधून रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला.

स्मार्टसिटी कंपनीमार्फतदेखील रस्ता तयार करण्याची तयारी दाखवण्यात आली असून, किती प्रमाणात निधी देता येईल यासंदर्भात लेखा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अशी माहिती स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली.

"नाशिक महापालिका हद्दीत प्रवेश करताना पेठ रोडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसमोर शहरा संदर्भात चुकीचा संदेश जात आहे, तर वाहनधारकांनादेखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता होणे गरजेचे आहे." - ॲड. राहुल ढिकले, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

Pune News : राज्यातील ‘या’ चार विद्यापीठांच्या अधिनियमांत सुधारणेसाठी समिती स्थापन

Pravin Darekar: 'या' महिलांना महापालिकेची कामे द्यावीत, प्रविण दरेकर यांची मागणी

Latest Marathi News Updates: राऊतांचं स्कील भल्या भल्यांना आत्मसात करता येणार नाही - आव्हाड

Tata Power: टाटाकडून मोठं गिफ्ट! तीन महिन्यात ४५ हजार घरात सौर प्रकाश

SCROLL FOR NEXT