Prakash Ambedkar esakal
नाशिक

Prakash Ambedkar : जनता विचारते आहे, पाच वर्ष झोपले होते का? मोदी-शहा यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही : प्रकाश आंबेडकर

Latest Political News : पंतप्रधान मोदी किंवा मंत्री शहा यांनी कितीही दौरे केले. त्यांच्या दौऱ्यांना, भूलथापांना आता जनता बळी पडणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी किंवा मंत्री शहा यांनी कितीही दौरे केले. त्यांच्या दौऱ्यांना, भूलथापांना आता जनता बळी पडणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. (Prakash Ambedkar criticism over Modi Shah)

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आंबेडकर नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात ३२ हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे. त्यावर पाच वर्ष झोपले होते का, असे जनता विचारत आहे. सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असल्याचे सरकार करत असून, हे खोटे बोलणारे सरकार आहे, अशी लोकांची भावना झाली असल्याचाही आरोप त्यांनी या वेळी केला.

दहा वर्षे काय करत होते, कितीही दौरे केले तरी काही फरक पडणार नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. राज्यातील धनगर-आदिवासी आरक्षण याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, की भाजपने हा उचलेला मुद्दा आहे. मात्र, धनगरबांधव भाजपला निवडणुकीत जागा दाखवेल. आदिवासी समाजाच्या अनेक संघटना आम्हाला यांच्याशी देणे-घेणे नसल्याचे सांगत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल शासनावर बंधनकारक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. (latest marathi news)

मनोज जरांगे-पाटील यांनी नेतृत्व करावे

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाबाबत विचारले असता आंबेडकर यांनी सांगितले, की जरांगे पाटील निवडणूक लढले नाही, तर ते शरद पवारांचे हस्तक आहेत, हा स्टॅम्प त्यांच्यावर बसणार आहे. जरांगे यांनी स्वतःला वाचविण्यासाठी त्यांच्या मनात असेन किंवा नसेन त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे. राजकीय भविष्य त्यांनी बघावे. जरांगे यांना जो पाठिंबा मिळाला, ते बघता प्रस्थापित मराठा लीडरशिपवर बांधव नाखूष असल्याचे दिसत आहे. त्यासाठी जरांगे यांनी नेतृत्व करावे, अशी लोकांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT