नाशिक

नंदुरबार जिल्ह्यातील ‘प्री-फॅब्रिकेटेड’ अंगणवाड्यांची माहिती केंद्र शासनाच्या अहवालात समाविष्ट होणार

CD
NSK26H34974 आमलाड (ता. तळोदा) : प्री- फॅब्रिकेटेड अंगणवाडीचे उद्‌घाटन करताना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे. शेजारी आमदार राजेश पाडवी आदी. NSK26H34975 नंदुरबार : ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशनतर्फे उभारलेल्या ईपीडीएस युनिटची माहिती घेताना मंत्री आदिती तटकरे. शेजारी आमदार राजेश पाडवी, आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे आदी. --- ‘प्री-फॅब्रिकेटेड’ अंगणवाड्यांची माहिती केंद्र शासनाच्या अहवालात समाविष्ट होणार --- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १३ : जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या नवनिर्मित इमारती राज्यात सर्वोत्कृष्ट आहेत. या अंगणवाड्यांची माहिती केंद्र शासनाच्या अहवालात समाविष्ट होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तळोदा तालुक्यातील आमलाड, तळवे, मोरवड, उमरी, मोड येथील अंगणवाड्यांच्या प्री-फॅब्रिकेटेड इमारतींचे लोकार्पण मंत्री तटकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद व महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने फिडींग इंडियाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारती बांधल्या आहेत. आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, सहायक जिल्हाधिकारी लघीमा तिवारी, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी पंकज पटले, तहसीलदार दीपक धीवरे, फीडिंग इंडियाचे वृषभ चोपडा, मोरवडच्या सरपंच अक्षता वळवी आदी उपस्थित होते. फीडिंग इंडिया संस्थेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्वयंपाकघराच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधा आणि कुपोषण निर्मूलनात नंदुरबार जिल्ह्याचे काम देशपातळीवर उत्कृष्ट आहे, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. आमदार राजेश पाडवी म्हणाले, की झोमॅटोच्या फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत उभारलेल्या आधुनिक अंगणवाड्यांचा विस्तार जिल्हाभर होणार आहे. डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या, की फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या स्वयंपाकघरातून रोज सुमारे पाच हजार ८०० बालकांना दोन वेळेचा आहार दिला जात आहे. डिसेंबरपासून जवळपास सुमारे २५ हजार बालकांना भोजन देण्याचे नियोजन आहे. नमन गोयल यांनी फिल्डिंग इंडियाच्या उपक्रमाविषयी माहिती दिली. मंत्री तटकरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री मातृत्व योजना, लेक लाडकी योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले. बेबी केअर किट देण्यात आले. एनर्जी प्रोटीन डेन्स सप्लिमेंट ईपीडीएस मॅन्युफॅक्चरिंग युनिट, फीडिंग इंडिया झोमॅटोच्या सेंट्रल किचन, ईपीडीएसनिर्मिती युनिटला मंत्री तटकरे यांनी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

Latest Marathi News Live Update: महाबळेश्वर आणि तापोळा परिसराचा होणार भव्य कायापालट; केबल-स्टेड ब्रिज, बोगदे आणि 'नवीन महाबळेश्वर' प्रकल्पाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

SCROLL FOR NEXT