Omicron variant Sakal media
नाशिक

नाशिकमध्ये ओमिक्रॉन प्रतिबंधाच्या अंमलबजावणीची तयारी

खासगी आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदीच्या निर्णयाची तयारी सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओमिक्रॉन व्हेरिएटंच्या (omicron varient) पार्श्वभूमीवर येत्या गुरुवार (ता. २३)पासून जिल्ह्यात लस(vaccine) न घेतलेल्या नागरिकांसाठी नियम आणखी कडक होणार आहेत. त्यांना शासकीय कार्यालये, बाजार समित्या, खासगी आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदीच्या निर्णयाची तयारी सुरू झाली आहे.

ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार वेगाने होत असताना, जिल्ह्यातील नागरिक लसीकरणासंदर्भात गंभीर दिसून येत नाही. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ४० लाख ५३ हजार असून, त्याचे प्रमाण ७८ टक्के आहे, तर २० लाख ६३ हजार नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतला असून, त्याची टक्केवारी ४० आहे. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. लशीचा एकही डोस न घेतलेल्या व्यक्तींना शासकीय कार्यालय, खासगी आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश न देण्याविषयी प्रशासन गंभीर आहे. त्यासाठी आदेश काढण्यात आला आहे. त्यासाठी विविध आस्थापनांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, हलगर्जी आढळल्यास आस्थापना प्रमुखावर कारवाई होणार आहे.

गुरुवारपासून होणाऱ्या या नव्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. शासकीय आदेशांनुसार सोमवार (ता. २०)पासून विविध कार्यालयात अंमलबजावणी सुरू होणार आहे. ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे अशा हॉटेल व संस्थांसाठी निर्बंध कडक केले आहेत. अनियमितता आढळल्यास परवानगी देऊ नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Board Exam Result: महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी आणि १२वी निकालावर संकट! निकाल उशिरा लागण्याची शक्यता; कारण काय?

Video: पुण्यात भयंकर प्रकार! मद्यपीने बस हायजॅक करुन विरुद्ध दिशेने पळवली; रहदारीच्या रस्त्यावर थरार

फॅशन आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो... Fascino 125 ला मिळाला प्रीमियम आणि स्टायलिश टच; नवी डिझाइन आणि किंम्मत काय?

Latest Marathi News Update: झोजिला खिंडीजवळील शैतान नल्ला येथे हिमस्खलनामुळे अनेक वाहने सापडली

Pune Fraud News : सराफाला १८ कोटींचा गंडा घालणाऱ्या कामगारासह तीन साथीदारांना अटक; सव्‍वापाच कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT