Dadasaheb Phalke Smarak, Nashik esakal
नाशिक

Nashik Phalke Smarak: फाळके स्मारक खासगीकरणाची प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik Phalke Smarak : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने पांडव लेण्या पायथ्याशी सुरू करण्यात आलेल्या स्मारकाचे खाजगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विविध कर विभागाने स्मारकातील विश्रामगृह, उपाहारगृह व वॉटर पार्कचे वर्षभरापूर्वी केलेले लिलाव रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. (process of privatization of Phalke Smarak has started nashik)

२३ वर्षांपूर्वी महापालिकेकडून दादासाहेब फाळके स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती. सुरवातीच्या काळात स्मारकातून चांगले उत्पन्न प्राप्त होत होते. मात्र, स्मारकाच्या एकेक विभागाचे खाजगीकरण करण्यात आल्यानंतर प्रकल्प तोटा जाण्यास सुरवात झाली.

२३ वर्षात स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीवर जवळपास १३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र त्या तुलनेत उत्पन्न अगदी कमी आले आहे. मार्गाची दुरवस्था झाल्याने खासगीकरणातून या प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दिवंगत सिनेदिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमार्फत फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यासाठी पीपीपी तत्त्वावर निवेदन प्रक्रिया राबविण्यात आली.

मात्र ऐनवेळी सदरची प्रक्रिया रद्द करण्यात येऊन त्या ऐवजी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर स्मारकाच्या विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खासगीकरणाला विरोध दर्शविला.

त्यानंतर महापालिकेच्या निधीमधून प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी त्यासाठी सल्लागार नियुक्ती प्रक्रिया राबविली, परंतु आता पुन्हा एकदा स्मारकाचा विकास खासगीकरणाच्या माध्यमातून करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.

त्याअनुषंगाने विविध कर वसुली विभागाने स्थायी समिती समोर प्रस्ताव सादर केला असून, त्यात विश्रामगृह उपाहारगृह व वॉटर पार्कचे लिलाव रद्द करण्याची मान्यता मिळावी असे सूचित करण्यात आले आहे.

बांधकाम विभागाने २० ऑगस्ट २०२३ ला अभिप्राय दिला होता, त्या पत्राचा संदर्भ घेऊन पुढील २५ वर्षांसाठी वॉटर पार्क व विश्रामगृह पीपीपी तत्त्वावर देण्याचे कारण दर्शविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT