Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest News esakal
नाशिक

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू

नरेश हाळणोर

नाशिक : राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, आगामी काळातील धार्मिक सण- उत्सव यासह विविध संघटनांकडून होणारी निदर्शने, आंदोलनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner jayant naiknavare) यांनी १३ ते २७ जुलै यादरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहेत. (Prohibition order enforced within limits of City Police Commissionerate Nashik Latest Marathi News)

राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना समर्थक व बंडखोर आमदार समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन, आंदोलनाची शक्यता, तसेच देशात काही व्यक्तींकडून जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केली जात असल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहे.

तसेच, आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी यासाठी पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी शहरात पंधरा दिवस मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही.

दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेतांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणुकीस बंदी घालण्यात आली आहे.

पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशारा पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT