नाशिक

‘सांन्स’ अभियान सुरू

CD
धुळे ः टुडे २ साठी, मेन --- लोगो छायाचित्र ः समर्पक घेणे... --- बालकांसाठी धुळ्यात ‘सांन्स’ अभियान सुरू न्यूमोनियापासून ठेवणार सुरक्षित; आरोग्य विभागातर्फे २८ फेब्रुवारीपर्यंत मोहीम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १३ ः पाच वर्षांखालील बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात गुरुवार (ता. १२)पासून सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘सांन्स’ अभियान सुरू झाले आहे. ते २८ फेब्रुवारीपर्यंत चालेल, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली. या मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती, आजाराचे वेळीच निदान, योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जाणार आहे. न्यूमोनिया हा फुफ्फुसांना होणारा एक गंभीर संसर्गजन्य आजार आहे. यामध्ये फुफ्फुसांमधील ऑक्सिजनची देवाणघेवाण करणाऱ्या पिशव्यांमध्ये द्रव किंवा पू साचल्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही व श्वास घेण्यास त्रास होतो. जिवाणू आणि विषाणूंमुळे होणाऱ्या या आजाराचा धोका प्रामुख्याने पाच वर्षांखालील बालके, कमी वजनाची व कुपोषित बालके, अपूर्ण लसीकरण झालेली बालके, तसेच धुराच्या संपर्कात राहणाऱ्या बालकांना सर्वाधिक असतो. --- १४-१ न्यूमोनियाची प्रमुख लक्षणे लहान बालकांमध्ये उल्लेखीत कोणतीही लक्षणे आढळल्यास पालकांनी विलंब न करता तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन आहे. यात खोकला आणि ताप येणे, श्वास घेण्याचा वेग वाढणे व श्वास घेताना छातीचा खालचा भाग आत ओढला जाणे, श्वास घेताना घरघर किंवा असामान्य आवाज येणे, बालकाला दूध पिण्यास किंवा खाण्यास त्रास होणे, बालक सुस्त होणे, प्रतिसाद न देणे किंवा ओठ व जीभ निळसर पडणे, अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला व त्यानुसार उपचार केले जावे. १४-१ प्रतिबंधात्मक उपाय स्तनपान व आहार- जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करावे. पहिले सहा महिने बालकाला केवळ आईचे दूध द्यावे आणि त्यानंतर वयानुसार सकस पूरक आहार द्यावा. लसीकरण- बालकांचे शासनाच्या वेळापत्रकानुसार संपूर्ण लसीकरण करावे; विशेषतः न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनचे (पीसीव्ही) डोस पूर्ण करावेत. स्वच्छता व पर्यावरण- घरात स्वच्छ हवा खेळती ठेवावी, धूम्रपान टाळावे, घराजवळ कचरा जाळणे टाळावे. जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात धुवावेत, तसेच खोकताना व शिंकताना रुमालाचा वापर करावा. १४-१ अभियानांतर्गत उपक्रम जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आशा स्वयंसेविकांमार्फत गृहभेटी देऊन बालकांची तपासणी केली जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांसाठी मोफत तपासणी, उपचारासह आवश्यक औषधे आणि ऑक्सिजन सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. तसेच माता बैठका, ग्रामसभा आणि जनजागृती कार्यक्रमांद्वारे पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. --- १४-१ चौकट नागरिकांना विभागाचे आवाहन ‘न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण करू या, प्रत्येक बालकाचे आरोग्य सुरक्षित ठेवू या’, असा संदेश देत बालकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार करून वेळ न घालवता तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र किंवा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बोडके यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

India Export: भारताच्या निर्यातीत 30 टक्क्यांची मोठी झेप; ऑक्टोबरमध्ये 8.47 लाख कोटींची निर्यात, व्यापार तुटीतही घट

'आग ये सुंदरा...तुझा माझा गो शोभल जोडा' आगरी कोळी गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले...

MPSC गट-क भरती; १६,७१७ पदांसाठी आजपासून भरता येणार अर्ज; आधी फॉर्म भरलेल्यांनाही मिळणार नव्या संवर्गांचा पर्याय

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईतील SBIच्या ग्लोबल आयडी सेंटरवर सायबर हल्ला

SCROLL FOR NEXT