Salman Sheikh esakal
नाशिक

PSI Convocation Ceremony: पोलीस कॉन्स्टेबल झालो तेव्हाच ‘कॅप’चे पाहिले होते स्वप्न! पैठणचा सलमान झाला पोलीस उपनिरीक्षक

संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयात २०१३ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो, त्याचवेळी मनाशी गाठ निश्चय केला होता तो पोलीस अधिकारी होण्याचा...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयात २०१३ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो, त्याचवेळी मनाशी गाठ निश्चय केला होता तो पोलीस अधिकारी होण्याचा. आज ते स्वप्न साकार झाल्याचा मनस्वी आनंद होतो आहे.

समाजातील गोरगरिबांना, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर सेवा करण्याचा माझा संकल्प असल्याचे मानाच्या रिव्हॉल्व्हरचा मानकरी ठरलेला सलमान शेख याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. (PSI Convocation Ceremony dream of Cap becomes true Paithan Salman becomes police sub inspector nashik news)

सलमान जहिर शेख हा मूळचा पैठण तालुक्यातील आढूळ गावातला. कुटूंबिय शेतकरी. सलमान याने कला शाखेत पदवी घेतली. त्याचवेळी त्याने अध्यापक शिक्षणक्रमही (डी.एड) पूर्ण केले. परंतु जागा नसल्याने त्याचवेळी २०१३ मध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होती.

सलमानने पहिल्याच प्रयत्नामध्ये संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्ये कॉन्स्टेबल म्हणून तो यशस्वी झाला आणि भरती झाला. त्याचवेळी त्याला नेहमी वाटायचे की आपणही पोलीस अधिकारी व्हावे.

त्यासाठी त्याने प्राथमिक जबाबदार्या पार पाडल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०२२ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये सलमान यास यश मिळाले.

गेल्या नऊ महिन्यातील खडतर परिश्रम व मेहनतीचे फळ म्हणजे, सलमान या १२३ व्या तुकडीचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी तर ठरलाच, त्याशिवाय तो मानाच्या रिव्हॉल्व्हरचा मानकरीही ठरला आहे.

असाही योगायोग

सलमान शेख हा २०१३ मध्ये संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाला. त्यावेळी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त संजय कुमार हे होते.

तर, आज, दीक्षांत सोहळ्यात मानाची रिव्हॉल्व्हरही पोलीस सेवेतून अपर पोलीस महासंचालक म्हणून निवृत्त झालेले संजय कुमार यांच्याच हस्ते स्वीकारली.

पोलीस सेवेत रिक्रुटमेंटही संजय कुमार यांच्या कार्यकाळात तर, मानाची रिव्हॉल्व्हरही त्याच संजय कुमार यांच्या हस्ते सलमान याने स्वीकारल्याचा असाही योगायोग सलमान याने अनुभवला.

"पोलीस कॉन्स्टेबल होताना जे स्वप्न पाहिले होते, ते आज पूर्ण झाले आहे. आता समाजातील पीडित, अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे."

- सलमान शेख, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT