Crime
Crime esakal
नाशिक

Nashik Crime: भेसळयुक्त पनीरच्या कारखान्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : अन्न व औषध प्रशासनाचा भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा टाकत १ लाख ६ हजाराचा साठा जप्त केला.

सिडकोतील अंबड लिंक रोडवर हा छापा टाकण्यात आला. रविवारी (ता. १७) अन्न औषध प्रशासनाचे पथक साडेसहा कार्यालयास गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (Raid on adulterated paneer factory at satpur by FDA Nashik Crime)

अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने अशोक जीतलाल यादव, मे. तिस्ता क्रोप केअर प्रा. लि., मोरे मळा, लक्ष्मण टाऊनशिप, अंबड लिंक रोड, सिडको, या उत्पादक पेढीची /कारखान्याची तपासणी केली.

तेथे रिफाईन्ड पामोलिन ऑइल, अननोन व्हाइट सॉलिड फ्लेक्सचा वापर करून पनीर अन्नपदार्थ बनवित असल्याचे आढळून आले.

त्यामुळे तेथून पनीर, रिफाईन्ड पामोलिन ऑइल, अननोन व्हाइट सॉलिड फ्लेक्सचा व मिक्स मिल्क या अन्नपदार्थांचे अन्नमुने घेऊन १९४ किलो पनीर जप्त करण्यात आले.

एकूण १, ६,४६० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर हा पनीर, व मिक्स मिल्काचा साठा नष्ट करण्यात आला. तर रिफाईन्ड पामोलिन ऑइलचा साठा अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

कारवाईतील चारही अन्न नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठविण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने अन्नसुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) म. मो. सानप यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी यो. रो. देशमुख, गोपाल कासार, नमुना सहायक विजय पगारे यांच्या पथकाने सहआयुक्त (नाशिक विभाग), सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT