Scenes from the play 'Sharanam Shanti'... esakal
नाशिक

Rajya Natya Spardha 2023: जीवनाचे मोल समजावणारे ‘शरणम् शांती’

प्रतीक जोशी

जीवनात उद्भवणारे प्रसंग अन् त्यातून आपल्या हातून घडणाऱ्या घटनांच्या पापक्षालनासाठी शांततेचा संदेश देणारी नाट्यकृती ‘शरणम् शांती’ ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मंगळवारी (ता. १२) विजय नाट्य मंडळ संस्थेतर्फे सादर झाले.

सतीश कोठेकर लिखित या नाटकाचे वरुण भोईर यांनी दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha 2023 Sharanam Shanti to teach value of life nashik)

गुरू- शिष्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगातून या नाटकाचे कथानक आकार घेते. गुरूंच्या विहारात शिष्य शांती पालनाचे धडे गिरवत असतो. विहारात नैराश्य आलेली मुलगी उपचारासाठी येते. शिष्य तिच्या प्रेमात वाहत जातो.

त्यांच प्रेम यशस्वी होते खरे मात्र उपचारानंतर ती परत जाते. तिच्या जाण्याने शिष्याला विरह सहन होत नाही, तोही विहारातून निघून जातो. काही दिवसांनी पुन्हा विहारात परततो, मात्र त्याच्याकडून मुलीची हत्या होते.

गुरुजी त्याला पापक्षालणसाठी शरण जायला सांगतात. त्याला पोलिस अटक करून घेऊन जातात. इकडे गुरुजींचे निर्वाण होते. तुरुंगवास भोगून आल्यावर गुरुजींची शांती प्रसाराची परंपरा तो स्वीकारतो.

जीवनात शांती प्राप्त करायची असेल तर शराणगतीशिवाय पर्याय नाही हा संदेश नाटकातून प्रेक्षकांपर्यंत पोचतो. नाटकात सरकत अन् फिरणारे नेपथ्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. नाटकाच्या कथानकाला साजेसे संगीत होतं.

अस्थेटिक संरचेनेतून हे नाटक प्रेक्षकांसमोर उभे राहत होते, मात्र प्रसंगानुरूप होणारी शांतता समजून घ्यायला प्रेक्षकांना काहीसं अवघड गेले. प्रकाशयोजनेने नाटकाला पेललं असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

कलावंतांनी उत्तम अभिनय साकारला. रुद्र ओहोळ, ज्ञानेश्वर कदम, महेंद्र चौधरी, अमोल थोरात, धनश्री शेळके, पूजा वाघ, हेमंत गव्हाणे, महेश खैरनार, रिषिका सातार्डेकर, सिमर सेठी, ओवी महाले या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या.

नेपथ्य किरण भोईर तर प्रकाशयोजना कृतार्थ कंसारा यांनी साकारली. सुरेश भोईर यांनी रंगभूषा तर सुरभी आणि संगीता यांनी वेशभूषा साकारल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT