An episode during the performance of the play 'Vidushak' 
नाशिक

Rajya Natya Spardha 2023: दीड शतकांचा सामाजिक प्रवास उलगडणारा ‘विदूषक’

प्रतीक जोशी

Nashik News: स्वातंत्र्यपूर्व अन् स्वातंत्र्योत्तर अशा दीड शतकातील समाज पर्यावरणाचा संदर्भ अन् अनुभव देणारी नाट्यकृती म्हणजे ‘विदूषक’. ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत शनिवारी (ता. २५) हार्ट बिट्स बहुद्देशीय विकास संस्था, धुळे या संस्थेतर्फे नाटक सादर करण्यात आले. प्रभाकर दुपारे लिखित या नाटकाचे मार्टिन सुभाष खैरनार यांनी दिग्दर्शन केले.

स्वातंत्र्यापूर्वी महात्मा जोतिबा फुलेंच्या काळात पुरोहितवर्गाकडून बहुजनांची कर्मकांडाच्या बदल्यात होणारी पिळवणूक पहिल्या अंकात दाखविण्यात आली. त्यानंतर दुसरा अंक स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरू झाला. (Rajya Natya Spardha 2023 unfolding social journey of century and half vidushak nashik news )

यात काळ बदलला, मात्र वृत्ती तीच असल्याचे दर्शविण्यात आले. या सर्वांत काळानुरूप नवा पोशाख, नवी भाषा अन् नवा आशय देत कथेचा उलगडा करणारा ठरला तो ‘विदूषक’. त्याच्या माध्यमातूनच नाट्यकृतीत मांडण्यात आलेल्या नव्या-जुन्या समाज पर्यावरण, आंतर्विरोधाचे संदर्भ अन् अनुभव प्रेक्षकांनी घेतला.

संहितेची मांडणी करताना दिग्दर्शकीय प्रभाव कमी पडताना दिसून आला. यासह नाटकातील कलावंतांचा रंगमंचावरील वावर, संवाद प्रभावशाली होण्याकरिता अधिक सरावाची आवश्यकता होती. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीतदेखील प्रभावीपणे साकारता आले असते.

प्रसंग पूर्ण झाल्यानंतर ब्लॅकआउटसाठी कलाकारांना रंगमंचावरून सूचना करावी लागणे, दुसऱ्या अंकात विदूषकाचा रेकॉर्डेड आवाजातून मंचावर सादर केलेला अभिनयाचा प्रयोगदेखील तितकासा यशस्वी झाला नाही.

यातून सरावाचा अभाव असल्याचे दिसून आले. एकूणच सशक्त संहितेच्या सादरीकरणात काहीसा अशक्तपणा जाणवला.

विशाल महाले, रोहित लोहार, गायत्री लोखंडे, दिनेश सोनवणे, प्राची पाटील, सुशांत यादव, कल्याणी कच्छवाह, अक्षय मालुसरे, सोमेश्वर हिरे, यश मोहिते, तुषार सातपुते, रोहित पाटील, मोनीश वाडेकर, विशाल अहिरे, रोहित अहिरे, रितेश लोहार, स्वाती पवार, निकिता पवार, हर्षल सोनवणे, विनोद फर्ताडे या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या. संगीत अभय अहिरराव, प्रकाशयोजना एडविन मलबारी, नेपथ्य नीलेश तेलंग, रंगभूषा माणिक कानडे व भगवान नवसारे, वेशभूषा पूजा खैरनार यांनी सांभाळली.

आजचे नाटक :- प्रथम पुरुष

लेखक व दिग्दर्शक ः संकेत सीमा विश्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

मी दमलीये! लग्नानंतर आशुतोष यांच्या पाहुण्यांना कंटाळलेल्या रेणुका शहाणे; शेवटी एके दिवशी रागात...

AAP Bihar Candidate List : बिहार निवडणुकीसाठी 'AAP'ने वाजवला बिगुल!, पहिली उमेदवार यादी केली जाहीर

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT