Citizens buying rangoli print with rangoli and replica of Ram Mandir. esakal
नाशिक

Ayodhya Ram Mandir : राममंदिराचे रांगोळी छापे ठरतायेत आकर्षण; रांगोळीची मागणी वाढली

राममंदिर उत्सव सोहळा आणि हळद-कुंकूनिमित्ताने रांगोळीची मागणी वाढली.

सकाळ वृत्तसेवा

Ayodhya Ram Mandir : राममंदिर उत्सव सोहळा आणि हळद-कुंकूनिमित्ताने रांगोळीची मागणी वाढली. पांढऱ्या रांगोळीची सर्वाधिक मागणी असल्याचेही सांगण्यात आले. तसेच राममंदिर आणि संबंधित रांगोळी छापे विक्रीस उपलब्ध झाले आहे.

विशेष करून राममंदिराचा छापा नागरिकाचे आकर्षण ठरत आहे. (Rangoli prints of Ram Mandir are attraction of citizen nashik news)

सण उत्सव आणि विविध सोहळ्याच्या निमित्ताने घर व्यवसायाचे अंगण आकर्षक रांगोळी काढून सजवण्याची पुरातन काळापासून परंपरा चालत आली आहे. धावपळीच्या दिवसांमध्ये रांगोळी काढण्याचे काहीसे प्रमाण कमी झाले आहे. तरी काही सणात आजही बहुतांशी नागरिक विशेषतः महिला अंगणात विविध रंगी रांगोळी काढतात. राममंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव सोहळा अशा सणांपेक्षा कमी नाही.

वर्षानुवर्षापासून प्रत्येक जण या सोहळ्याची वाट पाहत होते. सोमवारी (ता.२२) भाविकांच्या प्रतीक्षेस पूर्णविराम मिळणार आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र उत्सव साजरा होत आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजेच रांगोळी असते. या उत्सवानिमित्त घर आणि मंदिराचे अंगण रांगोळीने सजविण्यासाठी नागरिकांनी रांगोळी खरेदीकडे कल केला आहे.

तसेच संक्रांतनिमित्ताने सुरू असलेले हळद कुंकू कार्यक्रमासाठी अंगण सजविण्यासाठी गेल्या दहा दिवसापासून रांगोळीच्या मागणीत वाढ झाली आहे. दैनंदिन विक्रीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. लाल, पिवळा, हिरवा, नारंगी, निळा, पांढरा अशा विविध रंगात रांगोळी उपलब्ध आहे. यात पांढऱ्या रंगाच्या रांगोळी सर्वाधिक मागणी आहे.

त्याचप्रमाणे रांगोळीचे छापे, पेन, लक्ष्मी पावले गो पद्म अशा विविध प्रकारच्या संबंधित वस्तूही विक्रीस आल्या आहे. राममंदिर उत्सव सोहळ्यानिमित्त बाजारात यंदा प्रथमच अयोध्येतील राममंदिर प्रतिकृती असलेले छापे, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम प्रसन्न असे लिखित छापे विक्रीस आले आहे. राममंदिराची प्रतिकृती असलेल्या छाप्यास अधिक मागणी आहे. ५०, १२०, २५०, ३५० अशी विशेष छाप्यांचे दर आहे.

असे आहे दर

वस्तू......................दर

पांढरी.....................१० किलो

विविधरंगी...................२० किलो

रांगोळी छापे.................१० ते २००

लक्ष्मी पावले.................१० ते ३०

गो पद्म....................१० ते ३०

स्वस्तिक....................१० ते २०

रांगोळी पेन..................२५ ते ३०

''इतर वर्षाच्या तुलनेत रांगोळीत ३० टक्क्याने वाढ झाली आहे. राममंदिर प्रतिकृती असलेल्या रांगोळी छाप्यास अधिक मागणी आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेता दीपोत्सव पुन्हा आल्याचे भासत आहे.''- वसंत पाटील, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT