Rape Crime News
Rape Crime News esakal
नाशिक

Nashik Crime : नराधमाने मावस मेहुणीवरच दारू पाजून केला अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नात्यातल्याच पीडित युवतीला फिरण्याच्या बहाण्याने रिसोर्टवर नेले आणि दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.

पीडितेचे अश्लिल फोटो, व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा तिच्यावर बलात्कार करणाऱ्या संशयिताविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (rape of sister in law by sisters husband after drinking alcohol Nashik Crime)

३२ वर्षीय दळवी नामक संशयिताविरोधात दिलेल्या पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताचे स्टील रिटेलिंगचा व्यवसाय असून, संशयिताची मावस मेहुणी असलेली पीडिता त्याच्याच कार्यालयात नोकरीला होती.

जुलै २०२२ मध्ये संशयिताने तिला फिरण्याच्या बहाण्याने घोटी परिसरातील विवांत रिसोर्टवर नेले. त्याठिकाणी त्याने बळजबरीने तिला दारू पाजली.

त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने अश्लिल फोटो व व्हिडीओ काढले. त्याआधारे काही दिवसांनी तिला अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले आणि मुंबई नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

तसेच, त्याने तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ व धमकी दिली. त्याचा छळ असह्य झाल्याने पीडित तरुणीने पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT