degree admission  esakal
नाशिक

Agriculture Degree: कृषी पदवीच्‍या नोंदणीस 16 जुलैपर्यंत मुदतवाढ! प्रवेश वेळापत्रकात बदल

सकाळ वृत्तसेवा

Agriculture Degree : कृषी शाखेतील विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीची रविवारी (ता.९) पर्यंत असलेली अंतिम मुदत वाढविली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तर पहिली वाटप यादी २९ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. (Registration of Agriculture Degree has been extended till July 16 Change in admission schedule nashik)

विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण व एमएचटी-सीईटी किंवा, जेईई, नीट या प्रवेश परीक्षा दिलेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या या परीक्षांतील कामगिरीच्‍या आधारे कृषी शाखेतील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी नोंदणी करण्याची संधी उपलब्‍ध आहे.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठातर्फे डिप्‍लोमा अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

याअंतर्गत नोंदणीची मुदत संपलेली असताना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. ही वाढीव मुदत रविवारी (ता.९) संपली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पदवी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक असे-

* नोंदणीसाठी वाढीव मुदत--------------१६ जुलै

* अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी-----२० जुलै

* ऑनलाइन तक्रार नोंदणी-------------२१ ते २३ जुलै

* अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी------२७ जुलै

* पहिल्‍या फेरीची वाटप यादी---------२९ जुलै

* प्रवेश निश्‍चितीची मुदत-------------३० जुलै ते १ ऑगस्‍ट

* दुसर्या फेरीची वाटप यादी-----------३ ऑगस्‍ट

* प्रवेश निश्‍चितीची मुदत-------------४ ते ६ ऑगस्‍ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT