an attractive fishing boat on the bank of Chankapur Dam. esakal
नाशिक

SAKAL Exclusive : आदिवासी भागातील सौंदर्यस्थळे ठरतायेत ‘Pre-Wedding Destination'

किरण सूर्यवंशी

अभोणा (जि. नाशिक) : सध्या विवाहसोहळा एका विधीपुरता मर्यादित न राहता लग्नाआधीच्या क्षणांचा आनंद साठवून ठेवण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. भावी वधू- वराच्या पहिल्या भेटीपासून ते विवाह सोहळ्यापर्यंतचे सर्व क्षण पुन्हा अनुभवून साठवण्यासाठी ‘प्री- वेडिंग’ शूट केले जाते. यासाठी शूटिंग करणाऱ्‍या फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्सना मोठी मागणी आहे. ‘प्री- वेडिंग’ शूट जरा हटके असावे, यासाठी नैसर्गिक सौंदर्य असलेल्या भागांना प्राधान्य दिले जाते. (SAKAL Exclusive Beauty spots in tribal areas becoming Pre Wedding Destination Nashik news)

देवळीकराड हेमाडपंथी मंदिराच्या घुमटावरील कोरीव नक्षीकामावर सोडलेला लाईट इफेक्ट

कळवण तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले आहे. देवळीकराड येथील पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिर एक प्राचीन कलेचा उत्तम नमुना म्हणून आहे. येथील महादेव मंदिर अनोख्या शिल्प सौंदर्याचा साक्षीदार असल्याचा पुरावा देते. मंदिराचे प्रवेशद्वार, कठडे, सभामंडप, प्रत्येक खांब व आतील, बाहेरील घुमटावर केलेले कोरीवकाम व नक्षीकाम फोटोग्राफरला निःशब्द करून प्रत्येक कोपरा वेगवेगळ्या अँगलने कॅमेऱ्यात टिपण्यास भाग पाडते.

सकाळ, दुपार व रात्रीच्यावेळी विविध रंगांचे लाईट इफेक्ट देऊन भावी वधू- वरांचे शूट केले जाते. चणकापूर धरण एक खास डेस्टिनेशन आहे. पाण्याचा धबधबा, घनदाट वड, पिंपळाची झाडे, झाडातून येणारी सूर्यकिरणे याचा सुंदर मिलाफ फोटोग्राफर्सला आकर्षित करतो. सापुतारा थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे बोटिंग, रोप- वे, सनसेटपॉईंट, उंचावरून डोंगरावरच्या हिरवाईने तसेच, धुक्याने आच्छादलेला परिसर, सप्तश्रृंग गडावरील सेल्फीपॉईंट, घाटरस्ता, पायी जाणारा रस्ता, घनदाट झाडी फोटोग्राफी व व्हिडीओसाठी जे लागतेय ते सर्वकाही निसर्गानेच नटलेले आहे.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

त्यामुळे शहरी भागातील महागड्या तारांकित हॉटेलमधील कृत्रिम सेटपेक्षा नैसर्गिक सौंदर्यालाच वधु- वर व फोटोग्राफर्स प्राधान्य देतात.

"फोटोग्राफी व शूटिंगसाठी शहरीभागापेक्षा अभोणा परिसरातच देवळीकराडचे हेमाडपंथी मंदिर, चणकापूर धरण, सापुतारा, हतगड व सप्तश्रृंगगड आदी ठिकाणी खूप सुंदर नैसर्गिक सौंदर्य असल्याने आम्ही याच भागाला प्राधान्य देतो."- वासुदेव मुसळे, देवा फोटोज्‌, अभोणा

"कमी खर्चात, कमी वेळेत हवे तसे नैसर्गिक लोकेशन सहज मिळते. यासाठी कोणताही सेट उभारावा लागत नाही. प्रत्येकवेळी निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा मिळाल्याने एकसारखेपणा येत नाही. वधू- वरांचीही नैसर्गिक स्थळांना पसंती असते."

- संदिप शेवाळे, वृषाली फोटज्‌, कनाशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manjari Railway Accident : पुणे-दौंड डेमूच्या धडकेत तीन तरुण जागीच ठार; हडपसर पोलिसांकडून कसून तपास सुरू

Solapur Crime:'बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून दोघांनी केला चेक लंपास'; पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा..

चोर-पोलिसांचा जुना खेळ संपला !; 'चोरट्यांचा फोन पे, गुगल पेवरून संवाद'; पोलिसांना सापडू नये म्हणून नवी शक्कल?

Latest Marathi Breaking News : नंदुरबारमध्ये शिंदेंना भाजपचा दे धक्का, एकनिष्ठ शिवसैनिकाचा शिवसेनेला रामराम

Pune ATS : एटीएसच्या तपासात झुबेरचे दहशतवादी मनसुबे उघडकीस; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

SCROLL FOR NEXT