Conventional investment esakal
नाशिक

SAKAL Exclusive : पारंपरिक गुंतवणुकीचा आर्थिक प्रगतीत अडसर

विक्रांत मते

* नाशिककरांचा चैनीच्या वस्तू खरेदीकडे कल
* वित्त व्यवस्थापनाचा अभाव
* गरजेच्या यादीत मनोरंजनाला अधिक स्थान

नाशिक : सिनिअर सिटिझनचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये पैसा गुंतवणुकीची पारंपरिक पध्दत आर्थिक प्रगतीला अडसर ठरत आहे. जवळपास साठ टक्के नागरिक अजूनही मुदत ठेव (सेव्हिंग बँक), आवर्ती ठेव (रिक्युरिंग डिपॉझिट) मध्ये पैसे गुंतवणूक करत आहे.

सरकारी व्याजापेक्षा अधिक पैसा मिळवून देणाऱ्या जमीन किंवा स्थावर मालमत्ता, सोने, म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अवघे पंधरा ते वीस टक्के आहे. गुंतवणुकी बद्दलचे अज्ञान, गरजेच्या यादीत मनोरंजनाला दिले जाणारे महत्त्व, तसेच वित्त व्यवस्थापनाचा अभाव या तीन बाबी आर्थिक प्रगतीच्या आड येत आहे. (SAKAL Exclusive Conventional investment hindrance to economic progress Nashik News)

पैशाने पैसा ओढता येतो, ही म्हण अद्याप नाशिककरांच्या मनात रुजलेली दिसत नाही. त्याला कारण म्हणजे एका पाहणीनुसार नाशिककरांकडून अद्यापही पारंपरिक गुंतवणुकीला अधिक महत्त्व दिले जात असून, पारंपरिक गुंतवणुकीची हीच पध्दत आर्थिक प्रगतीला अडसर ठरत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने तसेच सेवानिवृत्तीनंतर अनेकांची पसंती नाशिकमध्ये स्थायिक होण्याकडे असते.

त्यामुळे सिनिअर सिटिझन्सचे शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठांकडून मुदत ठेव, आवर्ती ठेव किंवा सरकारी योजनांमध्ये पैसा गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. गुंतवणुकदारांपैकी जवळपास साठ टक्के नागरिक गुंतवणुकीची हीच पध्दत अवलंबितात. शेअर बाजार, म्युच्युअल फंड या जोखमीच्या क्षेत्रात गुंतवणुक करणाऱ्यांचे प्रमाण अवघे बारा ते पंधरा टक्के आहे. सोने खरेदीत महिलांचा टक्का अधिक असला तरी सोने गुंतवणुकीपेक्षा फॅशनला अधिक महत्त्व दिले जाते.

सोने खरेदीतून पैसा कमविणाऱ्यांचे प्रमाण क्षुल्लक आहे. क्रेडीट कार्डचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण अवघे पाच टक्के आहे. वास्तविक क्रेडीट कार्डच्या माध्यमातून खर्च झालेला पैसा ग्राहकांना मोफत चाळीस दिवस वापरता येतो. परंतु, अवघ्या पाच टक्के नाशिककरांनाच क्रेडीट कार्ड वापराचे फायदे लक्षात आले आहे. कोविडमध्ये मेडीकल पॉलिसी काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यापूर्वी सात ते आठ टक्के नागरिकांची मेडीकल पॉलिसी होती. चैनीच्या वस्तू खरेदीकडे नाशिककरांचा कल असून, त्याचे प्रमाण जवळपास ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

अर्थ व्यवस्थापनातील नाशिककरांच्या महत्त्वाच्या चुका

- सुरक्षिततेसाठी सेव्हिंग बँक खात्यामध्ये पैसा.
- अधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुदत ठेव, आवर्ती ठेव काढण्याकडे कल.
- मोबाईल, वाहने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकडे कल.
- सवलतीच्या वस्तू खरेदीकडे ओढा.
- क्रेडीट कार्ड वापराचे अल्प प्रमाण.
- वैद्यकीय विमा (मेडीकल इन्शुरन्स) काढण्याचे कमी प्रमाण.
- वित्त व्यवस्थापनाचा अभाव.
- स्वस्त व कमी काळासाठी टिकणाऱ्या वस्तूंवर खर्चाचे प्रमाण अधिक.
- सोशल मीडियावर अधिक वेळ खर्च.
- गरजेच्या वस्तूत मनोरंजनाला वरचे स्थान.

"सेव्हिंग बँक किंवा मुदत ठेवींमध्ये नाशिकमधून गुंतवणूक अधिक होते. स्थावर मालमत्ता, सोने किंवा शेअर मार्केटमधून अधिक पैसा प्राप्त होवू शकतो."
- अनिल चव्हाण, अध्यक्ष, कर सल्लागार नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन.

"मुदत ठेवीऐवजी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा इक्विटी मार्केटमधील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरते. मात्र, त्यासाठी जोखीम घ्यावी लागते."- राजेंद्र साळवे, फायनान्स मॅनेजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT