NMC & MNGL Latest News
NMC & MNGL Latest News esakal
नाशिक

Sakal Exclusive : NMCच्या जलवाहिनीला समांतर गॅस वाहिनी; MNGLचा धक्कादायक प्रकार

विक्रांत मते

नाशिक : महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून महापालिकेच्या जलवाहिन्यांना समांतर ज्वलनशील गॅस पुरवठा वाहिन्या टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जलवाहिनी दुरुस्त करताना भविष्यात मोठ्या अपघाताला नाशिककरांना सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Sakal Exclusive Gas pipeline parallel to NMC aqueduct Shocking news of MNGL Nashik latest marathi news)

सातपूर विभागातील अमृत गार्डन चौक परिसरात महापालिकेची थेट मुख्य जलवाहिनी गळती झाल्याने सिडको व सातपूर विभागातील पाणीपुरवठा गेल्या चार ते पाच दिवसांपासून विस्कळित झाला होता. २५ फूट खोल जाऊन पाइपलाइनची दुरुस्ती करणे भाग होते. असे वरवरचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात याच पाइपलाइनला लागून एक मीटर अंतरावर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने पाइपलाइन टाकली आहे.

विशेष म्हणजे त्या पाइपमधून गॅस सप्लाय होत असल्याने सिमेंट पाइपलाइनचे काम सुरू असताना धक्का लागून गॅस गळती होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असल्याने दुरुस्तीच्या कामाला तब्बल चार ते पाच दिवस लागून सातपूर व सिडकोवासीयांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. पाणीपुरवठा विभागाने बायपासद्वारे काही प्रमाणात टंचाईची तीव्रता कमी केली असली तरी यानिमित्त भविष्यातील गॅस गळतीचे मोठे धोके निर्माण झाल्याचे वास्तव समोर आले आहे.

बांधकाम व पाणीपुरवठा विभागातील असमन्वय

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला शहरात खड्डे खोदण्याची परवानगी बांधकाम विभागाने दिली आहे. परंतु, खड्डे खोदण्याची परवानगी देताना भविष्यातील धोक्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. एमएनजीएल कंपनीने खड्डे खोदताना जलवाहिन्यांना समांतर असे खड्डे खोदून एक ते दोन मीटर अंतरावर गॅस वाहिनी टाकली आहे.

जलवाहिन्यांचे कामे वारंवार निघतात. त्यामुळे जलवाहिन्यांचे काम करत असताना गॅस वाहिनीला सुद्धा गळतीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. भविष्यात गळती होऊन मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल, यानिमित्त उपस्थित होत आहे.

यापूर्वीदेखील पंचवटी विभागात आकाश पेट्रोलपंपाजवळ पाइपलाइन फुटल्याने तीन दिवस पाणीपुरवठा बंद होता. येथेही गॅसची पाइपलाइन आढळली. त्यामुळे दुरुस्तीसाठी विलंब झाला होता. बांधकाम व पाणीपुरवठा विभागाने समन्वय साधून गॅस पाइपलाइन किती अंतरावर खोदावी, यासंदर्भात धोरण आखले असते तर संभावित धोक्याची तीव्रता कमी करणे शक्य झाले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT