Budget Bag esakal
नाशिक

SAKAL Special: चालता... बोलता! ...अन्यथा आपलं बजेट होईल

लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याची शक्यता लक्षात घेत, सर्वच शासकीय कार्यालयात निधी खर्चासाठी लगीनघाई सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याची शक्यता लक्षात घेत, सर्वच शासकीय कार्यालयात निधी खर्चासाठी लगीनघाई सुरू आहे. त्यासाठी सर्वच विभाग कामाला लागले आहे. निधी वेळात खर्च न झाल्यास तो अखर्चित राहण्याची शक्यता आहे.

त्यावर झाले असे की, मिनी मंत्रालयातही निधी खर्चासाठी लगबग सुरू आहे. यातच यंदाचा अर्थसंकल्प देखील सादर करायचा आहे. हा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम विभागात सुरू आहे. असे असतानाच, कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा देखील होत आहे.

त्यामुळे कर्मचारी स्पर्धाच्या नियोजनात व्यस्त आहे. याच पार्श्वभूमीवर, एका विभागात चर्चांत एक वरिष्ठ कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्यास सांगितले की, अरे बाबा विभागातील कर्मचाऱ्यांना स्पर्धेसाठी सोडू नको.

कर्मचारी स्पर्धेसाठी गेल्यास आपले बजेट होईल, असे सुनावत दोघांनी चर्चा पुढे न नेता थांबवत कामाला सुरवात केली. (SAKAL Social political satire lok sabha election comedy tragedy nmc budget nashik news)

पण ते आलेच नाहीत

सघ्या निवडणुकांचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक संघटना आपले राजकीय अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करते. अशीच एक धार्मिक कार्य करणारी संघटना रस्त्यावर उतरली. थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भररस्त्यावर मेळावा त्यांनी घेतला.

त्यामुळे हे लोक आपल्याकडे निवेदन घेवुन येतीलच, अशी अपेक्षा बाळगून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी सुटी असतानाही कार्यालयात येऊन बसले. आत्ताच ते येतील, तेव्हाच येतील, असा विचार करत, करत मेळावा संपला आणि लोक घरी गेले तरी हे काही आले नाहीच.

शेवटी कार्यालय बंद करून अधिकारीही घरी गेले आणि सुटीचा दिवस कसा वाया गेला, याचा काथ्याकूट करत रात्र घालवली, आता बोला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: मोहन भागवत यांनी सातत्याने 'जनरेशन झेड'शी संवाद साधला आहे, याचा मला आनंद - राहुल नार्वेकर

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT