Ajit Pawar esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता

उपमुख्यमंत्री अजित पवार येणार म्हणून चोख पोलिस बंदोबस्त होता. यात राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याला पोलिसांनी अडवत, विचारणा केली...

सकाळ वृत्तसेवा

साहेब मी राष्ट्रवादीचाच

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन गट तयार झाले आहेत. अनेक पदाधिकारी अजित पवार गटात सहभागी झाले आहेत, तर काहींनी शरद पवार गटात राहणे पसंत केले आहे.

राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने कार्यकर्त्यांची जशी अडचण झाली तशीच पोलिस प्रशासनाचीही होत आहे. कोण कुठल्या गटात आहे, हेच उमगत नसल्याने कोणाला अडवावे, कोणाला सोडवे हेच पोलिसांना कळत नाही.

त्याचे झाले असे की, उपमुख्यमंत्री अजित पवार येणार म्हणून चोख पोलिस बंदोबस्त होता. यात राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याला पोलिसांनी अडवत, विचारणा केली. त्या वेळी हा कार्यकर्ता अजित पवार कट्टर समर्थक निघाला.

त्यावर त्यांनी पोलिसांना मी अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा आहे. एका विभागाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मला सोडा, अशी विनंती केली. पोलिसांनी त्यास निमूटपणे सोडून दिले. (SAKAL Special chalta bolta ajit pawar political satire comedy tragedy nashik news)

याला आमदार झाल्यासारखं वाटतंय

आमदार, खासदारकीचा बाज काही औरच असतो. लाखातून एक जण निवडून येतो. त्यामुळे त्याचे महत्त्व असते. प्रत्येकाला त्या पदापर्यंत पोहोचता येत नाही. परंतु असे असले तरी अनेकांना आमदार, खासदार म्हणून मिरवून घेण्याची भारी हौस असते.

ती हौस भागविण्याचे अनेक जण अनेक प्रकारे प्रयत्न करत असतात. एका कार्यक्रमानिमित्त शहरात मंत्री व आमदारांची रेलचेल होती. यात कार्यक्रमस्थळी आमदाराच्या गाडीच्या मागे असलेल्या सिम्बॉलकडे बोट दाखवून एकाचे सेल्फी घेण्याचे प्रकार सुरू होते.

परंतु पोलिसांना कार्यक्रमस्थळी आंदोलनाची भीती वाटत असल्याने प्रत्येकाकडे काळे झेंड्यांबाबत विचारणा होत होती.

त्यात आमदाराच्या गाडी मागे फोटो काढण्यात गुंतलेल्या एकावर दंडुका उगारल्यानंतर आमदारांवरही अशी वेळ येऊ शकते, असे म्हणत पळ काढला. परंतु उपस्थितांनी याला आमदार झाल्यासारखं वाटतंय म्हणत त्याची खिल्ली उडविली.

मला वाटले, जेवायला बोलवत असतील

नाशिक : महिला मंत्री म्हणून शपथ घेतल्यापासून मी नाशिकला येण्याचा प्रयत्न करत होते. माजी आमदार जयवंतराव जाधव यांनीही अनेकदा आग्रह केला. पण त्यांनी जेव्हा जेव्हा बोलावले, तेव्हा तेव्हा वाटले, की जयवंतराव मला जेवायला बोलवत आहेत.

आज इथे आल्यावर कळले, की या लोकांनी फार चांगले काम उभे केले आहे. त्यामुळे नववर्षाची माझी सुरवात चांगली झाल्याचे आदितीताईंनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT