Narhari Zirwal Esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता

सकाळ वृत्तसेवा

अरे देणारेच मागत आहे...

आपल्या साध्या सरळ स्वभाव, राहणीमानाने अगदी राज्याला भुरळ पाडणारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सध्या राज्यात कायमच चर्चेत असतात. जिल्ह्यात तर ते भाषणांमध्ये वरचढ ठरत आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या ननाशी येथे प्रारंभप्रसंगी त्यांनी समाजाचा बॅकलॉगच मांडला. दुर्देवाने ज्यांना ऐेकवायचे होते ते पालकमंत्री नेमके निघून गेलेले होते.

इगतपुरीतील मोडाळे गावात राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातही झिरवाळ यांनी नेहमीच्या शैलीत पाहुण्यांचे स्वागत करत आदिवासींच्या मागण्या मांडल्या.

केवळ मागण्या मांडल्या नाही, तर त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाला सूचना कराव्या, असे देखील सांगितले. कदाचित त्या वेळी ते सत्तेत असल्याचे विसरले असावेत... श्रोत्यांमधून ‘अरे हे तर सत्तेत आहेत, देणारेच मागत आहेत, मग इतरांचे काय’, अशी मिश्कीलपणे टिप्पणी केली. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy political nashik)

शिवमहापुराण कथेचा अनोखा महिमा

पाथर्डी येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेसाठी लाखोंची गर्दी होत आहे. बुधवारी (ता. २२) कथा संपल्यानंतर एकजण रडतच पार्किंगच्या ठिकाणी फिरत होता. दोघा-तिघांनी चौकशी केली असता, त्याची दुचाकी सापडत नाही, असे त्याने सांगितले.

सल्ले देणाऱ्यांनी मग ‘नीट आठवा, कुठे गाडी लावली होती, कोणत्या पार्किंगला होती, एकटे होते की सोबत होते’, अशी सरबत्ती केली. एकाने ‘कुणाला दिली तर नाही ना’, असे विचारले असता, ‘मी कशाला देईन कुणाला! बघा, चावी माझ्या खिशातच आहे’, असे सांगत त्याने चावीही दाखविली.

मग एकाने सल्ला दिला, की तात्पुरत्या पोलिस चौकीत जा आणि तक्रार नोंदवा. तितक्यात त्याला एक फोन आला. फोनवर बोलणे चालू असतानाच तो जोरजोरात हसायला लागला. त्याच्यासोबत उभे असलेल्या घोळक्यालाही नेमके कळेना.

त्याने फोन ठेवला आणि तो हसत हसतच म्हणाला, ‘अहो, मुलाचा फोन होता. तो विचारत होता, पप्पा गाडीची चावी कुठे आहे? गाडी घरीच आहे. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला, की मी आज दुचाकी आणलीच नव्हती.

गर्दीमुळे रिक्षाने आलो होतो. हे त्याने सांगताच समोरच्यांनी डोक्याला हात लावला. एकाने मग सल्ला दिला, की अहो कथा ऐकायला या; पण एवढेही तल्लीन होऊ नका, की नेमके कशाने आलात तेच आठवत नाही. तो बिचारा रडणारा मात्र तल्लीनावस्थेतच पुढे चालू लागला.

लोकशाहीतील लोकांचा रट्टा

राजकारणात व्यासपीठावर उपस्थित राहून मिरवून घेण्याची सवय काही न्यारीच असते. व्यासपीठावरील मुख्य वक्ता जेव्हा व्यासपीठावरून खाली उतरण्याचा संदेश देतो तेदेखील लक्षात घेतला जात नाही किंवा दुर्लक्ष तरी केले जाते.

सिडकोत अशाच एका कार्यक्रमात एका वक्त्याने माझे वजन कमी असल्याने मला काही फरक पडणार नाही; परंतु व्यासपीठावर उपस्थित असलेले व्यक्ती भारदस्त असल्याचा उल्लेख केला. याचाच अर्थ, व्यासपीठावरील गर्दी कमी करण्याचा सल्ला त्याने दिला. परंतु ऐकणार ते राजकारणी कसले.

अखेरीस वक्ताच खाली उतरण्यास निघाल्यानंतर श्रोते खालून ओरडले व व्यासपीठावरचे राजकारणी गडबडले. लोकशाहीत लोकांचा रट्टा महत्त्वाचा असतो. तो मिळाल्याशिवाय राजकारणी ध्यानावर येत नसल्याची खुमासदार चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT