foreign trip  esakal
नाशिक

SAKAL Special: चालता-बोलता

सकाळ वृत्तसेवा

दोन मित्रांची परदेशवारी...

सध्या परदेशात फिरायला जाण्याची क्रेझ जास्तच वाढली आहे. परदेशात जाण्यासाठी कोणी स्पॉन्सर मिळाला, तर सोन्याहून पिवळे, असे मानले जाते. खिशातले खर्च करण्यापेक्षा स्पॉन्सरच्या माध्यमातून परदेशवारी करायला कोणीही तयार असते.

त्यासाठी वेळ लागला तरी चालेल. अशाच एकाला एका जवळच्या मित्राकडून परदेशात फिरायची सातत्याने ऑफर येत आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ही ऑफर मिळत असल्याने तोदेखील खूश आहे.

परदेशात जाण्यासाठी त्याने पासपोर्ट काढला. परदेशात फिरायला जाण्याची तयारीदेखील केली. परंतु अचानक स्पॉन्सर गायब झाला आहे. अधूनमधून तो स्पॉन्सर उगवतो. ‘आपल्याला जायचे आहे, बरं का! ’असा संदेश देऊन पुन्हा गायब होतो.

स्पॉन्सरने परदेशात जाण्यासाठी ‘तू अमुक-तमूक कर’ असे काही दिवसांपूर्वीच सांगितल्यानंतर परदेशी जाणारा तेवढ्याच वेगाने त्याच्या अंगावर चालून आला.

पासपोर्टची मुदत संपण्याची वेळ आली असताना तू अजूनही मला परदेशात जाण्याचे आमिष दाखवतोय, असे म्हणताच स्पॉन्सरला आपला गेम लक्षात आल्याची जाणीव झाली व त्याने कशीबशी वेळ मारून नेली.

भाजप... काँग्रेसचे जाऊ द्या, आपले पाहा

लोकसभा निवडणुकीची सेमिफायनल म्हणून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे पाहिले जात होते. त्यामुळे या निवडणूक निकालाची उत्सुकता सर्वांना होती.

या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवत भाजपने बाजी मारली, तर तेलगंणात काँग्रेसचा विजय झाला आहे. या निवडणूक निकालाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

सकाळी-सकाळी जॉगिंग ट्रॅकवरही याच चर्चेचे पेव फुटले होते. दोन ग्रुपमधील चर्चेत, एका बाजूला भाजपनीतीचा बोलबाला सुरू होता. खालपासून वरपर्यंत संघटनात्मक बांधणी झाल्याने भाजप सरस ठरली, तर काहीजण पंतप्रधान मोदींमुळे हा विजय मिळाल्याचे सांगत होते.

दुसऱ्या बाजूने काँग्रेसने कशी लढत दिली हे पटवून दिले जात होते. पाऊण ते एक तास झालेल्या या चर्चेत, सर्वजण तल्लीन होऊन बुडाले होते.

अखेर जाण्याची वेळ आली असता एकाने जाऊ दे भाजप अन् काँग्रेस... आपलं पाहा. दिवसभरात आपल्यापुढे काय वाढून ठेवले ते बघा, सत्तेत कोणी आले तरी आपला संघर्ष कमी होणार नाही... चला कामाला लागा, असे सांगत सारेजण निघून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tawde Hotel Encroachment : कोल्हापुरात महापालिकेचा मोठा दणका! तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज चालणार जेसीबी; कडक आदेश जारी

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात पावसाचं दणक्यात पुनरागमन! घाटमाथ्यावरही धुवाधार; पुढील तीन ते चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज

ढिंग टांग : ऑल इज वेल..!

Pune: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील चार दिवस यलो अलर्ट

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT