Vada Pav & Chai esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता

एका शासकीय कार्यालयात बैठक सुरू होती...काही वेळात तिथं चहा आला, त्या वेळी अधिकाऱ्यांनी ‘वडे नाही आणले का’, असे विचारले अन् मग...

सकाळ वृत्तसेवा

वड्याची गाडी लेट!

एका शासकीय कार्यालयात बैठक सुरू होती. संबंधित अधिकारी बैठकीत माहिती देत होते. त्या वेळी त्यांनी चहा आणि वडे आणण्यास सांगितले. काही वेळात चहा आला, त्या वेळी अधिकाऱ्यांनी ‘वडे नाही आणले का’, असे विचारले.

त्यावर ‘आणायला गेलेत’, असे उत्तर आले. दालनातील सर्वांनी चहा घेतला. परत चर्चा सुरू झाली. काही जण चुळबूळ करू लागताच, अधिकाऱ्यांनी पुन्हा बेल वाजवून, ‘वड्याचे काय झाले... लोकेशन घ्या... नेमक्या कोणत्या गाडीने गेलाय, ते तरी विचारा आणि वेळ लागणार असेल तर तसे सांग म्हणावं’ असे वैतागून विचारले.

बिचारा शिपाई विचारतो म्हणून गेला. परत काही वेळ गेला आणि शिपाई पुन्हा चहा घेऊन आला. शिपायाच्या हातात चहाचा ट्रे पाहून अधिकाऱ्यांनी डोक्यालाच हात मारून घेतला.

‘वडे कुठेय...’, ‘येतोय सर...’. परत चहाचे घोट घेत-घेत पुन्हा चर्चा सुरू झाली. अधिकारी अन्‌ दालनातील साऱ्यांचेच लक्ष दालनाच्या दाराकडे होते. अखेर दार उघडले अन्‌ वडापावचा ट्रे दिसताच, ‘आला बाबा वडा..!’ असे कोणीतरी म्हणताच दालनात एकच हशा पिकला. (SAKAL Special chalta bolta nashik political satire comedy tragedy news)

निवडणूक तर लागू दे भाऊ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपल्याने महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवर प्रशासक राज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोणत्याही राजकीय कट्ट्यावर गेले, की जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होतील, याची चर्चा रंगलेली असते. त्यावर झाले असे, की जिल्हा परिषदेत एका स्मार्ट कार्यकर्त्याने आप्पाने माझे काम केले नाही, आता निवडणुकीत त्यांचे काम करणार असल्याचे आप्पांच्या कार्यकर्त्यांस सुनावले.

आप्पांच्या कार्यकर्त्यानेही लागलीच तुमचा भाऊही उभा राहणार आहे. आम्हीही त्यांचा कार्यक्रम लावू शकतो, हे लक्षात असू द्या, असे सांगितले.

त्यावर दोघांकडूनही निवडणूक चर्चेचे फंड रंगत गेले. शेवटी, स्मार्ट कार्यकर्त्याने ‘सारी चर्चा झाली. मात्र, निवडणूक कधी लागणार आहे, निवडणूक तर लागू दे भाऊ.. पाहू त्यानंतर काय करायचे,’ असे सांगत चर्चेतून काढता पाय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT