Boy Pointing towards River esakal
नाशिक

SAKAL Special: चालता-बोलता : नेमकं नदीत काय पडलं आहे?

सकाळ वृत्तसेवा

वेळ दुपारी तीन- साडेतीनची. ठिकाण तपोवन येथील स्‍वामीनारायण पूल परिसर. साधारणतः ३०० ते ४०० मीटरच्‍या या पुलावर पंचवटीकडील बाजूला ५० ते ६० जण उभे राहून खाली वाकून पाहत होते. रस्‍त्‍याने जाणाऱ्या गाडीतील लोकंही थांबून-थांबून घडलेल्‍या प्रकाराची माहिती घेण्यासाठी धडपडत होते. (SAKAL Special chalta bolta What exactly fell in river comedy tragedy political satire nashik)

दुचाकीवाले तर हमखास गाडी बाजूला करून काही क्षणांसाठी पुलावर उभे राहून गंमत पाहत होते; पण नेमकं झालं काय आहे, कुणालाच समजेना. सर्व एकमेकांना हिंदी, मराठीत विचारू लागले ‘नेमकं नदीत पडलं तरी काय आहे?’ कुणी म्‍हणे, ‘एकाने उडी मारली’, दुसरा म्‍हणे ‘मासे पकडणारं पोरगं सापडत नाहीए...’ असे एक ना अनेक अंदाज बांधण्याचे काम सुरू असले, तरी सत्‍यस्‍थिती कुणाला माहिती नव्‍हती.

गर्दी जमत राहिली, लोक पाहत राहिले. पण, फक्‍त मज्‍जा म्‍हणून लोकांना चकविण्यासाठी हा प्रकार घडविलेले काही युवक मात्र जनतेची ही धडपड पाहून लोटपोट हसले.

गंमत म्‍हणून नदीत पाहताना, या संपूर्ण प्रकाराची सुरवात करणाऱ्या युवकाने ‘कसं चकवलं’ म्‍हणत खिदखिद करीत हसविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

Mamata Banerjee's Big Move: पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; ‘TMC’ने केली घोषणा!

Latest Marathi News Live Update : टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Horoscope News : 'या' राशींच्या अडचणीचा काळ झाला सुरु ! अंगारक योगामुळे करावा लागणार संकटांचा सामना

SCROLL FOR NEXT