As there is no ground in schools and colleges, there is a rush to play on the open grounds of Masaga and Police Parade. esakal
नाशिक

SAKAL Special : ZP शाळांना मैदानाचा अन् क्रीडा शिक्षकांचा अभाव!; खेळ, क्रीडा विकास कसा होणार?

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर (जि. नाशिक) : मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळेत शिक्षणाबरोबरच खेळही शिकवले जातात. मात्र, जिल्ह्यातील ६१० शाळांमध्ये खेळण्यासाठी स्वतःची मैदानच उपलब्ध नसल्याने खेळ व क्रीडा विकास कसा साधला जाणार आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तीन हजार २६४ शाळा आहेत. दोन हजार ६५४ शाळांच्या आवारात क्रीडांगणांसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. (SAKAL Special ZP schools lack grounds and sports teachers no development of sports Nashik News)

ज्या ठिकाणी मैदान नसल्याने स्थानिक पातळीवर पर्यायी व्यवस्था करून मोकळ्या जागेवर शिक्षक खेळाची तयारी करून घेतात. बऱ्याच ठिकाणी गावांत असलेल्या शाळा इमारती, नव्याने किचन शेड, स्वच्छतागृह झालेल्या बांधकामांनी आधीच नेमके असलेले ग्राउंड छोटे झाले. अनेक शाळांची क्रीडांगणाच्या जागेवर खासगी अतिक्रमण, काही ठिकाणी मोकाट जनावरे अशा अनेक अडचणी येतात.

ग्रामीण भागातील अनेक शाळा गावापासून दूर असल्याने विस्तीर्ण मैदाने या शाळांना उपलब्ध असली तरी शहरी भागातही ही मोठी समस्या आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती तेवढीच महत्वपूर्ण आहे. शिक्षण व क्रीडा विभागाने पहिलीपासूनच खेळ विषय सक्तीचा केला आहे.

अलिकडे वर्गातील बौद्धिक व भाषिक खेळ, बैठे खेळ होतात. मैदानाअभावी खेळ व क्रीडाविषयक विषयावर शिक्षकांना अडचणींवर मात करावी लागते. शासनाच्या धोरणानुसार क्रीडा शिक्षक सातवीपर्यंत शाळेत नेमण्याची गरज आहे. मैदानी खेळामुळे आरोग्यविषयक मूलभूत बाबींवर भर देण्यात येतो. विद्यार्थ्याच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसह शालेय जीवनातच मैदानी खेळातून सांघिक भावना वाढीस लागते. खेळाची आवड निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर शाळेची, स्वतःची ओळखही निर्माण होते.

विशेषतः दरवर्षी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यक्ष करंडक ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मैदानी स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रमात संधी मिळते. क्रीडांगण व क्रीडा शिक्षक कमतरता असल्याने खासगी क्रीडा क्लासेसवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो. ग्रामीण भागात असे खासगी शिकवणारेही नाही. पालकांना परवडणारी बाब नाही. त्यामुळे मैदानेच महत्वाची आहेत.

मैदान नसलेल्या शाळा

बागलाण २५
चांदवड १८
देवळा १८
दिंडोरी २१
इगतपुरी ५२
कळवण २५
मालेगाव ३९
नांदगाव ४२
नाशिक १६
निफाड २१
पेठ ६
सिन्नर १९
सुरगाणा १७२
त्र्यंबक ९६
येवला ४०

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

"शिक्षक खेळ व क्रीडा विकासासाठी सातत्याने भर देतात. शनिवारी कवायतीसह कसरती घेतात. प्रत्येक शाळेला मैदान हवेच. खेळाचे साहित्य आणि क्रीडा शिक्षकही हवे. मागे शासनाने अंशकालीन निदेशक नेमले होते. तसे पुन्हा कला- क्रीडासाठी शिक्षक नेमावेत. विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होऊन उद्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू या मैदानातूनच तयार होतील. यासाठी शाळेच्या आवारात प्राधान्याने मैदान व्हावीत. आवारात नसल्यास गावठाणाच्या जमिनीत करावीत. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे शाळांनी प्रस्ताव सादर करावेत."
- प्रमोद चिंचोले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, नांदगाव

"खेळ हे आपल्याला धैर्य, शिस्त, गटामध्ये काम करणे, खिलाडू वृत्ती शिकवतात. खेळ आत्मविश्‍वासाची पातळी वाढविण्यास आणि सुधारणा करण्यात मदत करते. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते. शाळेच्या मैदानासाठी गावाने ठरवले तर सर्व शक्य असते."
- निलेश भामरे, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक, कळवण

"मुले जन्म घेतल्याक्षणीच शिकू लागतात. योगा, आरोग्य संगोपन व पोषक आहार, प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात. खेळण्यास प्रोत्साहन दिले तर त्यांची सामाजिक, भावनिक, बौद्धिक पातळीवरील वाढ व विकास व्यवस्थित होतो. मैदानासमवेत क्रीडा शिक्षक व खेळांचे भरपूर साहित्य असावे."
- संदिप हिरे, शिक्षक, उसवाड (ता. चांदवड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : कल्याणातील रिंगरोड टप्पा ३ च्या कामाला वेग,आठ महिन्यांत पूर्णत्वाचा निर्धार

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT