cold drink
cold drink esakal
नाशिक

सावधान! त्र्यंबकेश्वर तालुक्यात होतेय कालबाह्य शीतपेयांची विक्री

दिनेशचंद्र तायडे

मूलवड (जि. नाशिक) : त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या पश्चिम पट्टा हा संपूर्ण आदिवासी व अतिदुर्गम असुन बहुतांश नागरिक व दुकानदार निरक्षर व अज्ञानी आहेत. याचाच गैरफायदा घेत गुजरात, दमण या राज्यातील काही व्यावसायिक कालबाह्य झालेले खाद्यपदार्थ, विविध शीतपेये, पाण्याच्या बाटल्या, गावोगावी सर्रास विक्री करत आहेत.

हे कालबाह्य झालेले पदार्थ कमी किंमतीत आदिवासी भागातील अज्ञानी दुकानदारांना विकायचे व ते छापील किमतीत ग्राहकांना विकायला लावायचे असा हा भरपूर नफ्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून पश्चिम आदिवासी भागात सर्रास सुरू आहे. या भागातील नागरिकांच्या जिवाशी चाललेला हा खेळ काही वर्षांपासून सुरू आहे. हे भयावह चित्र या भागात पहायला मिळत असून याकडे अनेक वर्षांपासून संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे असे दिसुन येत आहे.

या भागात उन्हाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने साखरपुडा, लग्नसराईच्या कार्यक्रमात व इतर वेळीही वर्षभर आदरतिथ्य म्हणून शीतपेये वाटली जातात. त्यामुळे या आदिवासी भागात महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल या शीतपेयाच्या व्यवसायातून होते. पण या भागातील अज्ञानी दुकानदार शीतपेयांचा ठोक माल घेताना व‌ थेट ग्राहकांना विक्री करताना त्यावरील कालबाह्यची तारीख कोणीही बघतांना दिसत नाही. त्यामुळे आदिवासी भागातील जनतेच्या जिवाशी खेळ करून भरपूर पैसा कमावण्याचा फंडा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

गुणवत्ता तपासून खात्री करा

चक्कर येणे, अशक्तपणा जाणवतो, मळमळ होणे, उलट्या होणे. नियमित शीतपेये घेतल्याने शरीरावर दुरगामी परिणामही होतात. जास्त उन्हाच्या तडाख्यात शीतपेये पिल्याने उष्माघातही होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे शीतपेये पितांना त्या संबंधीची शुद्धता व गुणवत्ता तपासूनच खात्री करून त्याचा वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. संबंधित विभागाने या गंभीर समस्यांकडे तात्काळ लक्ष घालून आदिवासी जनतेच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

"आदिवासी भागातील नागरिकांनी उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे शीतपेये पितांना त्यावरील कालबाह्यतेचा दिनांक तपासूनच प्रमाणात शीतपेयाचे सेवन करावे, जेणेकरून आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही."

- ॲड. दिनेश पवार, आदिवासी सेवक, नाशिक

"आदिवासी भागातील दुकानदारांनी सुध्दा कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, शीतपेये, पाणीबाटली व्यापाऱ्यांकडून खरेदी करताना त्यावरील कालबाह्यतेचा दिनांक तपासूनच खरेदी करावी. तरच आपल्या आदिवासी बांधवांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबेल."

-नामदेव टोकरे, सामाजिक कार्यकर्ता, सादडपाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT