Dr. Sandeep Jha, Chairman of Sandeep Foundation, present on the occasion of MoU with Belarusian Technical University among other dignitaries. esakal
नाशिक

Nashik News: संदीप विद्यापीठाचा बेलारुशियन युनिव्हर्सिटीसोबत करार; आंतरराष्ट्रीय शिक्षणाची दारे खुली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परदेशी विद्यापीठासोबत सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. सोबतच अद्ययावत ज्ञान, तंत्रज्ञान व प्रशिक्षण सुविधा उपलब्‍ध होईल.

नवीन शिक्षण धोरणात अभिप्रेत असलेले परिणाम आधारित शिक्षण ध्येय सहज साध्य होईल, असे प्रतिपादन संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी केले. (Sandeep University signs agreement with Belarusian University Open doors to international education Nashik News)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

बेलारूस येथील १०२ वर्षाची परंपरा असलेल्या बेलारुशियन टेक्निकल युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार झाला. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी बेलारुशियन टेक्निकल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष सर्गेई ख-यतोंयचक, युरी निजालयिंचिक, मारीया व्योत्साफा, डॉ. दीपक पाटील, मनीष विंग आदी उपस्थित होते.

डॉ. संदीप झा म्हणाले, की कराराद्वारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे दार खुले होतील. विद्यार्थी विनिमय, विदेशी भाषा शिक्षण व्यवसाय प्रशिक्षण, नवीन संशोधन याबाबत संदीप फाउंडेशन, संदीप विद्यापीठ नवीन आयाम प्रस्थापित करेल, असा आशावाद डॉ संदीप झा यांनी व्यक्त केला.

बेलारूस विद्यापीठातर्फे सर्गेई यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेविषयी व संदीप विद्यापीठाविषयी गौरवोद्गार काढले. संदीप फाउंडेशनतर्फे डॉ. दीपक पाटील यांनी तर संदीप विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ.प्रसाद बाविस्कर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

संदीप विद्यापीठ मधुबनी कॅम्पस-बिहारतर्फे विवेक निकम यांनी करार केला. बेलारूस टेक्निकल विद्यापीठातर्फे अध्यक्ष सर्गेई यांनी करारावर स्वाक्षरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT