नाशिक

सप्तशृंग गडाला दीपावली यात्रेचे स्वरुप....

CD
पान-१ मेन VNI26B13496 सप्तशृंगगड ः दीपावली सुट्यांमुळे श्री सप्तशृंगगडाच्या मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ शुक्रवारी (ता.१३) झालेली भाविकांची झालेली गर्दी. ------------------- दिवाळी सुटीत दर्शनाचीही ‘पर्वणी’ --------------- सप्तशृंगगडावर गर्दी ः तीन दिवसात अडीच लाख भाविकांची हजेरी, अनेकांना दर्शनही दुर्लभ ------------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १३ : आदिमाया सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांंची पर्वणी साधत लाखो भाविक तीर्थाटनासाठी गडावर हजेरी लावत आहेत. चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवाप्रमाणेच गडाला दिवाळी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या तीन दिवसांत गडावर अडीच लाख भाविकांनी तर शुक्रवारी (ता.१३) दिवसभरात एक लाखांवर भाविक देवीचरणी नतमस्तक झाले. --------------- खानदेशातून गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या भाविकांबरोबरच गुजरात व महाराष्ट्रातील भाविक दिवाळीच्या सुट्टीचा योग साधून गडावर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहे. भाऊबिजेनंतर बुधवार (ता.११) पासून सप्तशृंगीगडावर भाविकांची गर्दीत वाढ होत आहे. त्यातच २४ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा हा साईबाबांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जात असल्याने दरवर्षी दिवाळी संपताच गुजरात राज्यातील हजारो भाविक वाहन व पदयात्रेने शिर्डी येथे जात असतात. ते प्रथम सप्तशृंगीचे दर्शन घेऊन शिर्डीकडे मार्गस्थ होत आहेत, ‘अंबे माते की जय’ जयघोष करीत भक्तांनी तीन ते चार तासाच्या प्रतीक्षेनंतर दर्शन होत होते. १६-१ तीस हजार भाविकांना प्रसाद न्यासाच्या प्रसादालयात चार दिवसांत सुमारे तीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. गर्दीमुळे ट्रस्टची धर्मशाळा, भक्तनिवासात जागा मिळत नसून खासगी लॉजिंगही फुल होत आहे. भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी न्यासाची प्रशासकीय व कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे स्वतः उपस्थित राहून व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. भाविकांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण केले जात आहे. ------------- १६-१ गडासाठी जादा बस हव्यात गडावरील भाविकांची संख्या लक्षात घेत एसटी व्यवस्थापनाने दिवाळी सुटीनंतरही अतिरिक्त बसेसचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे एसटीचे नियोजन फसलेले दिसून येत आहे. त्यातच रात्रीच्या वेळेस गुजरात व राज्यातून विविध ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. याचाच फायदा खासगी वाहनधारक घेत असून भाविकांना अव्वाच्या सव्वा भाडे देेेेत असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. --------------- १६-१ भाविकांची मोठी गैरसोयही एकूणच दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सप्तशृंगगडावर भाविकांचा अभूतपूर्व उत्साह आणि श्रद्धेचा महासागर पाहायला मिळाला. मात्र, वाढती गर्दी, रोपवेचे लांबलेले वेटिंग, वाहन पार्किंग आणि वाहतूक कोंडी यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयींचाही सामना करावा लागल्याचे चित्र होते. १६-१ मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी सप्तशृंगगडाला धमकीचा ई- मेल प्राप्त झाल्याची घटना समोर आल्यानंतरही भाविकांच्या श्रद्धेत कोणतीही कमतरता दिसून आली नाही. भाविकांनी मोठ्या संख्येने गडावर हजेरी लावली. ट्रस्ट आणि पोलिस प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक तीन भाविकाची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात येत होती. त्यानंतरच प्रवेश दिला जात होता. ------------- १६-१ चौकट करणे खासगी वाहनांमुळे कोंडीत भर चैत्रोत्सव, नवरात्रोत्सवात गडावर खासगी वाहनांना बंदी असते, त्यामुळे गडावर वाहनांची कोंडी होत नाही. परंतु इतरवेळी वाहने थेट नेण्याची परवानगी असल्यामुळे गडावर खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. दिवाळी सुट्टीनंतर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन खासगी वाहनांसाठी वाहनतळ व नवरात्र व चैत्रोत्सवाप्रमाणेच पोलिस बंदोबस्त असणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. १६-१ फनिक्युलर ट्रॉलीला पसंती फनिक्युलर ट्राॅलीत बसून दर्शनाला जाण्यासाठी भाविकांची प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तेथेही चार ते पाच तास वेटिंग असल्याने भाविकांचा हिरमोड होत होता. त्यामुळे भाविकांनी पायऱ्या चढून देवीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पहिल्या पायरीजवळील गर्दी पाहून अनेकांनी पहिल्या पायरीचे दर्शन घेत माघारी फिरणे पसंत केले. --------------

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

Global Indian CEOs : जगातील २०० दिग्गज कंपन्यांच्या तिजोरीची चावी भारतीयांच्या हाती! 'या' २३६ जणांचे वर्चस्व, महाराष्ट्र देशात अव्वल!

Latest Marathi News Live Update: एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरवर सायबर हल्ला

भीषण अपघात! बस कंटेनर ट्रकवर आदळली; २३ प्रवाशांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Drought Relief: दुष्काळात शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत, भूमिहीन मजुरांचे काय? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काय दिले निर्देश?

SCROLL FOR NEXT