Dignitaries present at the inauguration of Children's Drama Competition. In the second photo, a child artist performing in a children's drama competition.
Dignitaries present at the inauguration of Children's Drama Competition. In the second photo, a child artist performing in a children's drama competition. esakal
नाशिक

Savannah Bal Natya Spardha : ‘सावाना’ बालनाट्य स्पर्धेला प्रारंभ; पहिल्या दिवशी 3 बालनाट्यांचे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा

Savannah Bal Natya Spardha : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन साने गुरुजी कथामालेच्या वतीने आयोजित कै. रत्नाकर गुजराथी बालनाट्य स्पर्धेला बुधवारी (ता. २४) प्रारंभ झाला.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अभिनेत्री नूपुर सावजी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. ()

प्रा. दिलीप फडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वांना अभिनय करायचा असतो पण नाटकाच्या इतर अंगांचाही अभ्यास करायला हवा. नाटकात काम केल्यास या अनुभवाचा पुढे सर्व क्षेत्रांत फायदाच होतो, असे प्रतिपादन नूपुर सावजी यांनी केले. श्रीराम वाघमारे, आकाश खंकाळ, अमृता भावे स्पर्धेतील बालनाट्यांचे परीक्षण करणार आहेत.

या वेळी वाचनालयाचे प्रमुख सचिव देवदत्त जोशी, सहाय्यक सचिव जयेश बर्वे, सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, कार्यकारी मंडळ सदस्य मंगेश मालपाठक व सावाना सेवक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बालभवन प्रमुख प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता बागूल यांनी तर आभार गीतांजली नाईक यांनी मानले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ३ बालनाट्यांचे सादरीकरण झाले. पूनम पाटील अॅक्टिंग ॲकॅडमीच्या वतीने ‘सपान’ व ‘कष्टाचा रुपया’ ही बालनाट्य सादर झाले. ‘सपान’ या पुनम पाटील लिखित बालनाट्याचे नकुल चौधरी याने दिग्दर्शन केले.

कृत्तिका एलिस, स्वरा कुलकर्णी, आर्यन बोळीज, अर्थ अहीर, सावी सोनवणे, आर्वी चौधरी, भावेश शेजवळ, कृष्णा जगताप या बालकलाकारांनी भूमिका साकारल्या. संगीत नीलेश जगदाळे, नेपथ्य दुर्वाक्षी पाटील, सलमान शेख तर प्रकाशयोजना ओम शेवाळेंनी साकारली. ‘कष्टाचा रुपया’ पुनम पाटील लिखित नाटकाचे दुर्वाक्षी पाटील हिने दिग्दर्शन केले.

शर्वरी नांदोडे, कृष्णा जगताप, मुकुंद भारद्वाज, अवनी चव्हाण, ध्रुव ठोके, आदित्य पाटील, आयुष जाचक, काव्या महाजन, शायेशा कुमावत, आरुष भागवत, भावेश शेजवळ या बालकलाकारांनी भूमिका साकारल्या. इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूलतर्फे ‘सॉरी’ हे नाटक सादर झाले.

दिक्षा कडलग, मोनाली शार्दूल, अमेय गवळी, भाग्यश्री कडू, समर्थ गोफणे, समृद्धी म्हसणे, प्रदिप आडोळे, वेदांत चव्हाण, भूषण पंडित, हर्षद बिडवे, हुजेफ शेख, प्रथमेश कडू, ओम भागडे, संकेत शेळके, पुष्पा हगवणे, केतन गायकवाड, इच्छा लहाणे, पूजा मनोहर या बालकलाकारांनी भूमिका साकारल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT