Nachani Google
नाशिक

बियाणे निर्मितीसाठी ५० हेक्टरवर होणार नाचणीची लागवड

गौरव परदेसी

खेडभैरव (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात यावर्षी नाचणी (नागली) पिकाचे बीजोत्पादन प्रकल्प ५० हेक्‍टरवर राबविण्यात येत आहे. तालुक्यातील वासाळी, मांजरगाव, धारगाव, नागोसली, शेवगेडांग आदी गावांमधील नाचणी बियाणे निर्माण करण्यासाठी तयार असणाऱ्या शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात येत आहे. seed production project of nachani crop is being implemented on 50 hectares In igatpuri taluka


शेतकऱ्यांना नाचणी पिकाच्या उत्पादनात वाढ व्हावी, गावातच उच्चप्रतिच्या व भेसळ विरहित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावेत, तसेच नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या नागली पिकाचा प्रसार व्हावा हाच उद्देश या बीजोत्पादन प्रकल्पाचा आहे. नाचणीचा आहार मानवासाठी उच्चप्रतिचा समजला जातो. हेच महत्व समोर ठेवून ग्राम बीजोत्पादन उपक्रमात समाविष्ट शेतकऱ्यांना फुले नाचणी-१ हे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा) नाशिक यांच्यातर्फे देण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना तणनाशके, युरिया ब्रिकेट आदी निविष्ठांचा ही पुरवठा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी फुले नाचणी -१ हे उच्चप्रतिचे बियाण्यांची सुधारित लागवड तंत्रज्ञान वापरून उत्पादन व उत्पादकता वाढवावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.

६० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिक

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत ठाकूरवाडी, काननवाडी, खेड, परदेशवाडी, आंबेवाडी, इंदोरे, बारशिंगवे या गावातील परिसरात ६० हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहेत.या गावात देखील एकरी एक किलो प्रमाणे फुले नाचणी बियाणाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.नुकतेच वासाळी येथे शेतकऱ्यांना नाचणी बियाण्याचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच काशिनाथ कोरडे, सीताराम खाडे, दशरथ गिलांदे, रमेश दराने, एकनाथ खाडे, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, कृषी सहाय्यक सुधाकर सोनवणे, शांताराम गभाले, ग्रामसेवक नीलेश चव्हाण आदी उपस्थित होते.



कृषी विभागाने परिसरातील शेतकऱ्यांसाठी विद्यापीठातून नागलीचे ब्रीडर सीड उपलब्ध करून दिले आहे. नागलीसारख्या पिकाला सध्या चांगली मागणी आहे. याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. नागली पिकाकडे वळावे, हा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.
- किशोर भरते, कृषी पर्यवेक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT