Trainee Officer with Tribal Development Project Assistant Collector Vishal Narwade
Trainee Officer with Tribal Development Project Assistant Collector Vishal Narwade esakal
नाशिक

Nashik News: अधिकारी प्रशिक्षणासाठी यंदा कळवण प्रकल्पाची निवड!

रवींद्र पगार

Nashik News : केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव यावा, तेथील पद्धती, निधी आणि योजनांची अंमलबजावणी कशी होते, यासाठी यंदा देशभरातून कळवण (जि. नाशिक) आदिवासी विकास प्रकल्पाची निवड झाली आहे.

देशभरातून तेरा प्रशिक्षणार्थी आयपीएस, आयएएस, आयएफएस अधिकारी येथे दाखल झाले आहेत. पुढील आठ दिवस ते ग्रामीण भागातील चणकापूर आणि दहिंदुले येथे राहून विविध योजनांची माहिती आणि तेथील ग्रामजीवनाचा अनुभव घेणार आहेत.

शासकीय योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या कशी करता येते, याचाही ते अभ्यास करतील. (Selection of Kalwan project for officer training this year 13 IPS IAS IFS from across country entered Chankapur Dahindule village Nashik News)

ग्रामीण लोकांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती, आदिवासी विकासाशी संबंधित सर्व शासकीय योजनांबद्दल माहिती जाणून घेत त्यांचे मूल्यांकन करणे तसेच सर्व ग्रामस्थांशी सतत संवाद साधून आदिवासींचे जीवनमान उंचावणे व गावाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमी मसुरी (उत्तराखंड) येथील तेरा आयएएस आणि आयपीएस अधिकारी कळवण प्रकल्प कार्यालयात दाखल झाले आहेत.

दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवड झालेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, गावपातळीवरील जीवनशैली, ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या आणि ग्रामीण विकास योजनांची अंमलबजावणी जाणून घेण्यासाठी आठवडाभर गावभेट कार्यक्रम घ्यावा लागतो.

यापूर्वी हे विद्यार्थी उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि नजीकच्या राज्यांमध्ये गावभेट करत असत. मात्र या वर्षी ‘आदिवासी वन गाव’ उपक्रमांतर्गत भारतातील मोजकीच गावे या उपक्रमासाठी निवडण्यात आली असून, यामध्ये कळवण प्रकल्पाचा समावेश आहे.

आठ दिवसांच्या गावभेटीसाठी तेरा आयएएस आणि आयपीएस अधिकारी कळवण प्रकल्प कार्यालयात दाखल झाले आहेत. प्रकल्प कार्यालयातील चणकापूर (ता. कळवण) व दहिंदुले (ता. बागलाण) या आदिवासी गावांचा अभ्यास हे प्रशिक्षणार्थी अधिकारी करणार आहेत.

२७ ऑगस्ट २०२३ ते २ सप्टेंबर २०२३ यादरम्यान हे सर्व प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे त्यांच्या टीमसह पुढील आठ दिवस गावातच राहणार आहेत.

ग्रामअभ्यास दौरा

आठ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तेरा अधिकारी प्रशिक्षणार्थी दोन गटांत विभागले जातील.

एक गट चणकापूर येथे, तर दुसरा गट दहिंदुले या गावात जाणार आहे. सर्वच्या सर्व अधिकारी पुढील आठ दिवस गावातच राहतील. श्री. नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते आदिवासी ग्रामीण लोकांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती जाणून घेतील.

तसेच ते आदिवासी विकासाशी संबंधित सर्व शासकीय योजनांबद्दल माहिती जाणून घेतील आणि त्यांचे मूल्यांकन करतील. शेवटी हे अधिकारी त्या गावांच्या विकासात आणखी सुधारणा करण्यासाठी काही सूचना गावांना करतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या अधिकाऱ्यांचा समावेश

दिक्षा भोरिया (आयपीएस, मथुरा), स्वाती शर्मा (आयएएस, जबलपूर), राजबहादूर सिंग मीणा (आयएफएस, करौली), जय करण यादव (आयआरएस आयटी, गाझीपूर), सुवांगी खुंटिया (आयएएस, ओडिशा), अंजली शर्मा (आयएएस, बिहार), आरंशा यादव, (आयपीएस, गुडगाव), विभाकर पाल (आयआरएस आयटी, मसुरी), मनोज सिंग (आयटीएस, गोरखपूर), तन्मय खन्ना (आयएएस, दिल्ली), सिद्धार्थ शुक्ला (आयएएस, आझमगड), गौरवकुमार त्रिपाठी (आयपीएस, गोरखपूर), गौरव यादव (आयपीएस, झाशी).

कळवण प्रकल्प निवडीमागील कारणे

- प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडेंकडून तंत्रज्ञान आणि फेशिअल बायोमेट्रिक्सचा वापर.

- अधिकाऱ्यापासून सर्वच कर्मचाऱ्यांना शिस्त, वक्तशीरपणाचे धडे

- पहिल्या दिवसापासूनच शैक्षणिक गुणवत्तेवर भर. बोर्डाच्या परीक्षा प्रथमच झूम अॅप वापरून ऑनलाइन.

- चांगली कामगिरी न करणाऱ्या शाळांवर कारवाई. वेतनवाढ थांबवली. उत्तम कामगिरीसाठी पुरस्कार.

- पात्र शेतकऱ्यांना विहिरींचे वाटप. योजना पारदर्शकपणे राबविली.

- पोलिसपाटील भरतीसाठी महिला आरक्षण शंभर टक्के.

- निकृष्ट दर्जाच्या बांधकामांवर कारवाई, बांधकामाची गुणवत्ता निश्चित.

- बोगस डॉक्टरांना अटक करून आदिवासींच्या आरोग्याचे संरक्षण.

- विकासप्रक्रियेत आदिवासींच्या योगदानाची दखल, आदिवासी नवरत्न उपक्रम.

- प्रकल्प कार्यालयातील विद्यार्थ्यांना ओडिशा येथील खेलो इंडिया नॅशनल गेममध्ये संधी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT