Suspected bike thief caught on CCTV esakal
नाशिक

Nashik Crime News : ऑनलाईन दुचाकी विक्रीस काढणे पडले महाग

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : महाकाली चौकातील एका तरुणाला आपल्या दुचाकीचे फोटो विक्रीकरिता ऑनलाइन व सोशल मीडियावर टाकणे चांगलेच महागात पडले. दुचाकीची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन संशयित फरार झाल्याची घटना घडली आहे. (Selling two wheeler online stolen at cidco Nashik Crime News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

प्रशांत जगताप यांनी दुचाकी (एमएच- १५- ईवाय- ४८१८) विकायची असल्याने त्यांनी सोशल मीडिया व ऑनलाइन ॲपवर दुचाकीचे फोटो अपलोड केले. काही दिवसातच त्यांच्याकडे सात ते आठ व्यक्तींनी भेट घेऊन दुचाकी बघितली.

अशा बुधवारी (ता.१२) एका अज्ञात संशयितांचा जगताप यांना फोन आला. बोलणे झाल्यानंतर जगताप यांनी त्याला शुभम पार्क जवळील एका ज्वेलर्स दुकानाजवळ बोलविले. दोघांची चर्चा झाल्यानंतर, संशयिताने ट्रायल करता दुचाकी घेऊन गेला तो पुन्हा आलाच नाही.

ज्या नंबर वरून जगताप यांना फोन करण्यात आला होता, तो बंद होता. जगताप यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जगताप यांनी थेट अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. या वेळी ज्वेलर्स दुकानाजवळील माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांचे कार्यालय असून, त्या कार्यालयाच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT