shivbhojan thali esakal
नाशिक

Nashik News: शिवभोजनचे 18 लाख थकले! केंद्रचालकांवरच आली उपासमारीची वेळ!

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : बेघर आणि गोरगरिबांना केवळ दहा रूपये इतक्या अल्पदरात भोजन देऊन त्यांची भूक भागविणाऱ्या शिवभोजन केंद्र चालकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. चार महिन्यापासून निफाड तालुक्यातील शिवभोजन केंद्रांचे सुमारे १८ लाख रूपयांचे अनुदान थकले आहे.

वेळेवर अनुदान न मिळाल्याने सात पैकी एका शिवभोजन केंद्राला टाळे लागले आहे. देयके पाठवूनही अनुदान मिळत नसल्याने शासनाच्या या चांगल्या योजनेचे निफाड तालुक्यात तीनतेरा वाजले आहेत. (Shiv Bhojan Kendra 12 lakh rupees subsidy pending at niphad nashik news)

गोरगरिब, बेघर, असंघटीत कामगार अशा लोकांना अवघ्या दहा रूपयांमध्ये पोटभर जेवण मिळावे या उद्दात हेतूने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन केंद्रे सुरू केली आहेत. या केद्रांमुळे कोरोना काळात अनेकांना याचा लाभ झाला. सध्याही मजूर, बेघर, असंघटित कामगारांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळतो.

शिवभोजन केंद्र चालकांना गेल्या चार महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शिवभोजन चालकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. पदरमोड करून ते केंद्र चालवित असल्याने तेच आता आर्थिक अडचणीत आले आहेत. यामुळे तालुकाच्या ठिकाणी असलेल्या निफाड शहरातील शिवभोजन केंद्र बंद पडले आहे.

उर्वरित केद्रांनाही घरघर लागली आहे. सध्या सुरू असलेल्या सर्वच शिवभोजन केंद्रचालक उधार आणि उसवनवारी करून कसे तरी नागरिकांना शिवभोजन देत आहेत. तेही आता कर्जबाजारी झाले आहे. लवकर अनुदान न मिळाल्यास उर्वरित केंद्रही बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.

गोरगरीब, बेघर व मजुरांची भूक भागवणाऱ्या शिवभोजन थाळी योजनेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे शासनाची ही चांगली योजना सुरू राहावी, यासाठी शासनाने थकित अनुदान तात्काळ केंद्र चालकांना तातडीने द्यायला हवे अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

सत्ताकारण हेच कारण...

मिळालेल्या माहितीनुसार शिवभोजन केंद्र हे तत्कालिन महाविकास आघाडीच्या सरकारने सुरू केले होते. मात्र आता सत्तांतर झाले असून ही केंद्रे सुरू राहिली तरी सत्ताधाऱ्यांना त्याचा काहीही फायदा नाही असे गणित सत्ताधाऱ्यातील काहींनी मांडले आहे.

सरकार नसताना शिवभोजन योजनेचा उदोउदो नको, म्हणून अनुदान रखडविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र या योजनेमुळे गरिबांचे पोट भरत होते हेही शासनाने लक्षात घ्यावे असे काही केंद्रचालकांचे म्हणणे आहे.

"वारंवार मागणी करूनही शासनाकडून चार महिन्यांचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे आमच्यावर उसनवारी करून शिवभोजन केंद्र सुरू ठेवण्याची वेळ आली आहे. लवकर अनुदान न आल्यास केंद्र बंद करावे लागेल."- शोभा भागवत, शिवभोजन केंद्र, पिंपळगाव बसवंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT