suhas kande esakal
नाशिक

शिवसेना आमदाराचा आत्मदहनाचा इशारा

सकाळ वृत्त सेवा

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas kande) यांच्यातील वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. निधी वाटपातील असमतोलाच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत त्याबाबतचे इतिवृत्त मंजूर करू नये. तसा प्रस्ताव आल्यास आत्मदहन करू असा इशारा आमदार कांदे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakre) यांची देखील भेट घेतली.

कांदे म्हणाले,

जिल्हा नियोजन मंडळाच्या ८ नोव्हेंबरच्या बैठकीत निधी वाटपाबाबत अनियमितता तथा गैरव्यवहार झाल्याचा माझा दावा आहे. त्याविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे मागील वर्षी मंजूर कामांचा उर्वरित निधी वर्ग करू नये. अन्यथा बैठकीच्या दिवशीच जिल्हाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे. त्यानंतरही जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव आल्यास आत्मदहन करीन.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आमदार सुहास कांदे यांनी त्याबाबतचे इशारा पत्रदेखील दिले. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेण्यास आपली हरकत नाही. मात्र निधी वाटपाबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा प्रकार घडला आहे. ही बाब न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याने संभाव्य बैठकीत मागील वर्षाच्या निधीच्या मंजुरीचे इतिवृत्त मंजूर करू नये, अशी आपली मागणी आहे.

त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले. आमदार कांदे यांच्या पत्रामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री छगन भुजबळ व त्यांच्यातील सुप्त संघर्षाचा दुसरा अंक सुरू होण्याची चिन्ह आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT