flex placed and discussed at Rathchakra Chowk & puppet appearance of the circle. esakal
नाशिक

Shiv Senaच्या ‘कठपुतली’ देखाव्याची सर्वदूर चर्चा

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : येथे शिवसेनाप्रणीत युवक मित्रमंडळाने गणेशोत्सवात ठेवलेला कठपुतलीचा देखावा आणि शेजारीच बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह ‘कठपुतलीला विचार नसतो’, अशा आशयाचा महाकाय फलक परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. सेनेमधील फूट आणि नवे सरकार याच्याशी याचा काहीच संबंध नाही असे कितीही सांगितले जात असले तरी अप्रत्यक्ष त्यावरच हे भाष्य आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांत उमटत आहेत. (Shiv Sena puppet dance appearance spectacle in indiranagar ganeshotsav 2022 nashik Latest Marathi News)

एरवी कठपुतली म्हटली की लहान मोठ्या सर्वांनाच या कठपुतलींचा नाच आणि विविध गाण्यांवर केलेली करमणूक भावते. विशेषतः लहान मुलं त्यात अधिक रमतात. रथचक्र चौकात शिवसेनाप्रणीत युवक मित्रमंडळाने संस्थापक संजय गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त उभारलेला हा देखावा बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

लहान्यांची करमणूक होत असताना सोबत असणाऱ्या मोठ्यांचे लक्ष मात्र शेजारीच लावलेला बाळासाहेब ठाकरे यांचे जणू देखावा दाखवणारे छायाचित्र असलेला फलक आणि त्यावर असणाऱ्या ओळी लक्ष वेधून घेत आहेत. कठपुतलीला विचार नसतो, दोरी ज्याच्या हातात, त्याच्याच विचारांनी नाचावंच लागतं’, या ओळी या फलकावर असून त्याचा संबंध येथे भेट देणारे नागरिक शिवसेनेमधील फूट आणि सध्याचे शिंदे सरकार यांच्याशी लावत आहेत.

अनेकांनी याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विचारलेदेखील. मात्र, राजकीय बाबींचा आणि या देखाव्याचा काही संबंध नसून करमणुकीसाठीच हा देखावा उभारला आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र कठपुतलीचा खेळ कसा चालतो याचा संबंध नागरिक मात्र राजकीय परिस्थितीशीच लावत आहेत. हा फलक आणि हा देखावा आता सोशल मीडियावरदेखील व्हायरल झाला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी प्रकाश चौधरी, पंकज कराडे, मंडळाचे अध्यक्ष आदित्य दुसाने, कार्याध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष मनोज सैंदाणे आणि सदस्य संयोजन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Fifty: पोराने पुन्हा कमाल केली! वैभवची षटकार खेचून फिफ्टी... शमीला सलाम अन् प्रतिस्पर्धींना फोडला घाम

New Prisodn Rules: कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन पैसे कमवण्याची मुभा; संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये परतावे लागणार

२२ चेंडूंत ११२ धावा; अनमोलप्रीत सिंगच्या शतकाने अभिषेक शर्माची खेळी व्यर्थ ठरवली; T20तील पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग...

Numerology Facts : 'या' मूलांकाच्या व्यक्ती असतात अत्यंत उदार अन् दानशूर; अनोळखी व्यक्तींनाही मदतीचा हात देतात!

Marathi News Live Updates : संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT