Narayan-Rane-Sanjay-Raut 
नाशिक

नारायण राणेंनी अतिशहाणपणा केला; संजय राऊतांचा निशाणा

कार्तिक पुजारी

शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.

नाशिक- शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. नाशिकने उठवलेलं वादळ अजून शमलेलं नाही. आता कानफडात मारण्याची भिती वाटते. कायदेशीर, नाहीतर लगेच गुन्हा दाखल होतो आणि अटक होते. याला जबाबदार नारायण राणे आहेत. राणें यांनी अतिशहाणपणा केला, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला.

आपण नेहमी सभ्यता पाळावी. आपल्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. त्यांचा राजकारणाला मंत्र होता. जीओ ओर जीने दो. उगाच कोणाला आम्ही अंगावर घेणार नाही, पण जो अंगावर येणार त्याला सोडणार नाही .काही तरी एक जनआशीर्वाद यात्रा निघाली आहे. आपला त्याला विरोध नाही. जनआशीर्वाद यात्रा काढा किंवा येड्यांची जत्रा काढा. अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या पण काहींनी त्यांच्या जत्रा केल्या. अनेक भाजप नेत्यांनी यात्रा काढल्या. पण, त्या कोणींनी शिवसेनेवर, मुख्यमंत्र्यांवर टीका केली नाही, असं राऊत म्हणाले.

पंतप्रधान मोदी काय सांगतात हे मला जास्त माहिती आहे. नव्या मंत्र्यांनी राज्यात जाऊन केंद्राच्या कामाची माहिती द्यावी ही जबाबदारी दिली आहे. सर्व मंत्री शहाणपणाने प्रचार करत आहेत, पण एक अतिशहाणा पक्षाचा आदेश पाळत नाही. मोदींचा प्रचार न करता शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका करत आहे. वारंवार जीभ घसरल्यावर एकदा लगाम लावणं आवश्यक होतं. ते काम मुख्यमंत्र्यांनी केलं. मंत्र्याची भाषा सभ्य असावी. ज्याने घटनेची शपथ घेतली आहे त्याने पदाची प्रतिष्ठा पाळणे गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्याचा गौरव आज देशात का होतोय? कारण ते संयमाने, माणूसकीपणाने वागत आहेत. त्यांचा कधीही तोल ढासळलेला मी पाहिला नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उज्वल होतंय. हे महाशय राणे महाराष्ट्राच्या विमानतळावर उतरल्यापासून त्यांची जीभ घसरतेय. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. राणे मंत्री झाल्यापासून भाजप दहा फूट मागे जातोय. पुढील काही दिवस अर्ध्या फूटावर येईल. संयम पाळला नाही, राजकीय द्वेष, सूड, या भावनेने वागलो तर जे महाभारत, रामायणात झालं तसा भाजपचा घात होईल. शिवसेना पुढेच जाईल. कारण आमचे पाय जमिनीवरच आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT