crime Case
crime Case esakal
नाशिक

Nashik Crime: शिवशाही बसचालक आत्महत्या आर्थिक देवाणघेवाणीतून! सहकारी महिला वाहकासह चौघांच्या विरुद्ध गुन्हा

अजित देसाई

Nashik Crime : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरी शिवारात गेल्या आठवड्यात शिवशाही बसच्या चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. नादुरुस्त बस मध्ये घडलेला हा प्रकार मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आला होता.

मृत चालकाच्या वडिलांनी आपल्या मुलास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच बसची महिला वाहक, तिची बहीण व आणखी दोन अनोळखी पुरुषांविरुद्ध तक्रार केली असून वावी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत चालकाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतील मजकुरावरून ही तक्रार देण्यात आली. (Shivshahi bus driver commits suicide through financial exchange Offense against four including fellow female carrier Nashik Crime)

दोनवाडे (भगूर) येथील रहिवासी असलेले राजेंद्र हिरामण ठुबे यांनी दि. 25 मे रोजी च्या मध्यरात्री नादुरुस्त असलेल्या शिवशाही बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला होता. या घटनेमुळे मोठी उडाली होती.

दि. 24 मे रोजी च्या दुपारी तीन वाजता रस्त्यावर नादुरुस्त असलेली बस दुरुस्त करण्यासाठी सिन्नर आगारातील पथक मध्यरात्री दीड वाजता आल्यानंतर चालकाच्या आत्महत्येच्या प्रकरणाला वाचा फुटली होती.

दोन दिवसांपूर्वी मयत चालक राजेंद्र ठुबे यांच्या मुलाने पोलिसांनी दिलेला मोबाईल फोन, तसेच त्यांच्या खिशात आढळून आलेली रोख रक्कम तपासली असता श्री. ठुबे यांच्यासोबत नियमित ड्युटी करणारी सहकारी महिला वाहक, तिची बहीण व आणखी दोघांची नावे असलेले चिट्ठी सापडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मृत चालकाचे वडील हिरामण रघुनाथ ठुबे यांनी आपल्या मुलासोबत कर्तव्यावर असलेली महिला वाहक, तिची बहीण व आणखी दोघांविरुद्ध मुला स आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

त्यानुसार वावी पोलीस ठाण्यात रविवारी चौघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मयत चालक ठुबे यांच्या समवेत राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगर क्रमांक एक मध्ये वाहक पदावर कार्यरत नीलिमा नंदू वानखेडे, रा. जेलरोड यांनी सोबत काम करत असल्याचा व ओळखीचा फायदा घेत श्री. ठुबे यांच्याकडून वेळोवेळी हात उसने पैसे घेतले होते.

ही रक्कम जवळपास चार लाख 59 हजार रुपये इतकी झाली होती. या रकमेची मयत श्री. ठुबे यांनी वाहक श्रीमती वानखेडे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी बहीण प्रमिला इंगळे आणि अन्य दोघे ठक्कर बंधू (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या माध्यमातून श्री. ठुबे यांना त्रास देणे सुरू केले होते. तसेच घेतलेल्या पैशांपैकी केवळ 60 हजार रुपये रक्कम परत केली असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT